Petrol diesel price Petrol diesel price
उत्तर महाराष्ट्र

साक्रीत पेट्रोल शंभरी पार

साक्रीत पेट्रोल शंभरी पार

सकाळ डिजिटल टीम

साक्री (धुळे) : पेट्रोल पंपांवर आज पेट्रोलच्या दराने (Petrol diesel price) शंभरी ओलांडली असून प्रति लिटर शंभर रुपये १० पैसे असा आजचा पेट्रोलचा दर झाला आहे. तर डिझेलचा दर देखील ९०.५६ इतका झाला असून, हे दर पाहिल्यानंतर मात्र वाहन चालकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. (sakri-petrol-pump-petrol-price-hundred-rupees-cross)

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. मध्यंतरी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान पेट्रोल डिझेलचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र निवडणूक निकाल संपल्यानंतर मात्र पुन्हा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ व्हायला लागली. गेल्या आठवडाभरापासून येथील पेट्रोल पंपांवर (Sakri petrol pump) पेट्रोल शंभरच्या उंबरठ्यावर पोचले होते. सोमवारी (ता.२४) सायंकाळी पेट्रोलचा दर ९९.८८ इतका होता. यात आज देखील दरवाढ झाल्याने हा दर शंभर रुपये १० पैसे इतका झाला असून डिझेल देखील ९० रुपये ५६ पैसे इतके झाले आहे.

वाहन चालकांमध्ये नाराजी

पेट्रोलची शंभरी पार झाल्याने व डिझेल देखील लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता दिसू लागल्याने वाहन चालकांमध्ये मात्र मोठी नाराजी दिसून येते आहे. आधीच कोरोनाचे संकट, त्यात लागलेला लॉकडाऊन यामुळे मेटाकुटीला आलेले सर्वसामान्यांचे अर्थकारण इंधनाच्या वाढत्या दारांनी मात्र पूर्त कोलमडणार आहे.

लोकांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवत स्थापन झालेले विद्यमान केंद्र सरकार लोकांचे अच्छे दिन मात्र हिरावून घेत आहे. पूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती थोड्या फार वाढल्या तरी आकांड-तांडव करणारे आज मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. यातून सर्वसामान्यांना मात्र आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून इंधनाचे दर कमी करणे आवश्यक बनले आहे.

- सचिन सोनवणे, शहराध्यक्ष काँग्रेस, साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT