free textbooks 
उत्तर महाराष्ट्र

मोफत पाठ्यपुस्तकांसाठी २०१९-२० ची विद्यार्थिसंख्या गृहीत 

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक २०२१-२२ साठी नियमित पाठ्यपुस्तके व लार्ज प्रिंट पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी नोंदवणे, या संदर्भातील प्रक्रिया सुरू झाली आहे. २०२१-२२ साठी २०२०-२१ ची विद्यार्थिसंख्या गृहीत न धरता २०१९-२० ची विद्यार्थिसंख्या गृहीत धरून पाठ्यपुस्तक मागणी नोंदणी सुरू झाली आहे. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवीसाठी प्रतिविद्यार्थी अनुक्रमे २५० आणि ४०० रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेने दिली आहे. 

दरवर्षी मागील वर्षाच्या यू-डायसनुसार पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर करण्यात येते. सद्यःस्थितीत यू-डायस डाटा २०२०-२१ तयार करण्यात आलेला नाही. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होण्यापूर्वी बालभारतीच्या ई-बालभारती पोर्टलवर पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदणी करून पाठ्यपुस्तकांचा पुरवठा विहित मुदतीत करणे आवश्यक आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या दिवशी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करता येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकात निर्मितीबाबत केंद्र शासनाकडून राज्य शासन आणि परीक्षा परिषदेला कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. 

यू- डायस प्लसवरील नोंदणीनुसार मागणीचे आदेश
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांमधील मुला- मुलींसाठी यू- डायस प्लस २०१९-२० या विद्यार्थिसंख्येनुसार पाठ्यपुस्तकांची ऑनलाइन मागणी मार्चअखेरपर्यंत नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. २०१९-२० व २०२०-२१ यामध्ये विद्यार्थिसंख्या यामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. म्हणून २०१९ २० च्या विद्यार्थिसंख्येनुसार पाठ्यपुस्तकांची मागणी करण्याचे आवाहन परीक्षा परिषदेने केले आहे. दरम्यान, कोरोना लॉकडाउनमुळे शाळेत दाखल विद्यार्थिसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे. पटावरील नियमित संख्येवरही परिणाम झाल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. म्हणूनच शाळाबाह्य विद्यार्थी नोंदणी सुरू झाली आहे. 

धुळे तालुक्यात २०२०-२१ मध्ये प्राप्त पाठ्यपुस्तके 

पाठ्यपुस्तक मागणी ३,३२,६७८
प्राप्त पाठ्यपुस्तके ३,३२,६७८
वितरित पुस्तके ३,३२,६७८
टक्केवारी १००

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

Wardha : लग्नाच्या वरातीत पुतण्यानं काकासह चुलत भावाला संपवलं, आरोपी अल्पवयीन; काय घडलं?

SCROLL FOR NEXT