bribe 
उत्तर महाराष्ट्र

मुख्याध्यापक तरी मागितली लाच; तीन हजार रूपये घेताना रंगेहाथ पकडले

रमाकांत घोडराज

धुळे : तीन हजाराची लाच स्वीकारताना पिंजारझाडी (ता. साक्री) येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकास धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाचखोर मुख्याध्यापकाविरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंजारझाडी (ता. साक्री) येथील तक्रारदाराचे वडील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिपाई आहेत. ते पदावरून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पेन्शन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय धुळे येथे सादर करण्यासाठी आणि प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक गुलाब नथ्थू पिंजरी (वय ५५) यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने धुळे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार पथकाने महाविद्यालयाच्या आवारात सापळा रचला. तक्रारदाराकडून पहिला हप्ता म्हणून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक पिंजारी यास पथकाने ताब्यात घेतले. 
नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक, मनजितसिंग चव्हाण, संदीप सरग, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर आदींनी ही कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT