उत्तर महाराष्ट्र

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्‍ला; चाकूने भोसकून मारण्याचा प्रयत्न

शिवसेनेच्या पदाधिकार्याला ठार मारण्याचा प्रयत्न; चाकूने भोसकले

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर (धुळे) : येथील (Shirpur shiv sena) शिवसेनेचे शहर उपप्रमुख प्रविण धनगर तथा बंटी लांडगे यांना शनिवारी (ता.१९) रात्री चाकूने भोसकून ठार करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. (shirpur-Attempt-to-assassinate-Shiv-Sena-leader)

प्रविण प्रल्हाद धनगर (वय ३३, रा.भरतसिंह नगर, शिरपूर) शिवसैनिकांमध्ये बंटी लांडगे या नावाने ओळखले जातात. शहरातील बसस्थानकाजवळ ते शिवभोजन थाळी केंद्र चालवितात. १९ जूनला सकाळी ते केंद्रावर जात असतांना त्यांच्या ओळखीच्या गोकुळ नामक व्यक्तीने थांबवून पाच हजार रुपये उसनवार मागितले. त्यावर लांडगे यांनी आता खिशात पैसे नसून रात्री देतो, असे सांगितले. रात्री केंद्र बंद केल्यानंतर मित्र आदेश ढिवरे याच्यासोबत स्कूटीवर बसून ते शहरातील मच्छीबाजारात गोकुळला पैसे देण्यासाठी गेले. पैसे दिल्यानंतर काही वेळ ते गोकुळशी बोलत उभे राहिले.

कानाजवळ व पाठीवर वार

रात्री साडेदहाला अनोळखी संशयिताने चाकूसारख्या धारदार हत्याराने लांडगे यांना डाव्या कानाजवळ व पाठिवर चार ते पाच ठिकाणी भोसकले. अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्याने लांडगे यांना भोवळ आली. गोकुळने त्यांना पालिका रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार करुन त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र जखमांचे स्वरुप गंभीर असल्याने त्यांना धुळे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सोबतच्या पदाधिकार्यांनी सांगितले.

संशयितांची दिली माहिती

संशयित २२ ते २४ वर्षे वयोगटातील असून त्याची उंची पाच फूट सहा इंच होती. अंगात चौकडीचा पांढर्‍या रंगाचा शर्ट होता, अशी माहिती बंटी लांडगे यांनी पोलिसांना दिली. मच्छीबाजारातून अमरधामकडे जाणार्या रस्त्याने संशयिताने पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करुन शोध सुरु केला. दरम्यान या हल्ल्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट असून संशयिताच्या अटकेनंतरच त्याबाबत खुलासा होणार आहे. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT