suspended  
उत्तर महाराष्ट्र

काम न करताच सादर केली खोटी बिले; दोन अभियंते निलंबित  

सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : काम न करताच खोटी बिले सादर केल्याप्रकरणी येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर. आर. पाटील व कनिष्ठ अभियंता व्ही. एम. चव्हाण यांना गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी निलंबित केले. 
गिधाडे (ता. शिरपूर) येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिगत गटारीच्या कामात स्वतः स्वाक्षरी करून खोटे बिल मंजूर केल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे व कामात अनियमितता बाळगणे अशा आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली. संबंधित कामाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन लाख ९९ हजार रुपयांच्या तांत्रिक खर्चाला मंजुरी दिली होती. 

फेरमुल्‍यांकनात आढळले सत्‍य
संबंधित अभियंत्यांनी सादर केलेल्या मोजमाप पुस्तिकेतील नोंदींचा संशय आल्याने गटविकास अधिकारी शिंदे यांनी १३ जानेवारीला गिधाडे येथे भेट देऊन पाहणी केली. त्यांनी कामाचे फेरमूल्यांकन केले असता, केवळ एक लाख ४४ हजार २३६ रुपयांचे काम झाल्याचे आढळले. संशयित अभियंता पाटील आणि चव्हाण यांनी मात्र एक लाख ५५ हजार ६६४ रुपयांचे अतिरिक्त मूल्यांकन काम केलेले नसतानाही मोजमाप पुस्तकात नमूद केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे श्री. शिंदे यांनी उभयतांना कारणे दाखवा नोटीस बजावली. विहित मुदतीत दोघेही समाधानकारक उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे आदेश गटविकास अधिकारी युवराज शिंदे यांनी दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT