vaccination center vaccination center
उत्तर महाराष्ट्र

केंद्रावर पहाटे साडेचारपासून रांगा; लशी कमी अन् कुपन जास्त वाटल्याने वादविवाद

केंद्रावर पहाटे साडेचारपासून रांगा; लशी कमी अन् कुपन जास्त वाटल्याने वादविवाद

सकाळ डिजिटल टीम

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस (Corona vaccination) घेण्यासाठी कुपन आवश्यक असून, शनिवारी (ता. १५) कुपन घेण्यासाठी चक्क पहाटे (Covid center) साडेचारपासून रांगा लागल्या. लस कमी व कुपन जास्त दिले गेल्याने वादविवाद होऊन पोलिसांना बोलवले. दरम्यान, लशी पुरवठाबाबत योग्य नियोजन नसल्याने दररोज गोंधळ उडत आहे. (songir corona vaccination center people queue)

ग्रामीण रुग्णालयात ४५ ते ६० वयोगटांतील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस कोव्हॅक्सिनचा घेतल्यानंतर या वयोगटातील ग्रामस्थांना दुसरा डोसच मिळत नसल्याने व मुदत संपल्याने वणवण भटकावे लागत होते. दरम्यान १८ ते ४४ वयोगटांतील व्यक्तींना कोव्हिशील्डचे लसीकरण सुरू झाले. मात्र अद्यापही हजारो युवकांचे लसीकरण बाकी असताना मध्येच कोव्हॅक्सिन लस आली. तेही फक्त दुसरा डोस म्हणून देण्यात येत आहे. पहिली कोव्हॅक्सिन घेतलेल्या जिल्ह्यातील अनेकांनी दुसऱ्या डोससाठी सोनगीरला धाव घेतली. त्यामुळे एकच गर्दी होऊन वादविवाद होत आहेत.

तीन- चार तास उन्हात

आधीच ७० टक्के लोकांना अ‍ॅपवर लसीकरण नोंदीबाबत पुरेशी माहिती नाही. पहिल्या डोसच्या नोंदीची माहिती जपून ठेवली नाही. एकाला लस देण्यासाठी चार ते पाच मिनिटे सहज लागतात. त्यामुळे अनेकांना लसीसाठी तीन ते चार तास उन्हात ताटकळत बसावे लागते. कधी दोनशे, तर कधी शंभर लसी उपलब्ध होतात.

सोयीसाठी कुपन पण..

प्रत्येकाला लस घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून आधी क्रमांक लिहिलेले कुपन दिले जातात. सुरवातीला सकाळी नऊला कुपन दिले जाई. पण लोक कुपन मिळावे म्हणून सकाळी लवकर येऊ लागले. आज चक्क पहाटे साडेचारपासून लोक ग्रामीण रुग्णालयात आले. सहालाच कुपन वाटायला कर्मचाऱ्यांना भाग पाडले. शंभरहून अधिक कुपन वाटल्याचे सांगण्यात आले. पण लशी ८० होत्या. त्यामुळे उर्वरितांनी गोंधळ घातला. त्यासाठी पोलिसांना बोलावले. मात्र उर्वरितांना सोमवारी (ता. १७) प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर वाद हळूहळू शमला. यापार्श्वभूमीवर लसीकरणासाठी दोन केंद्र असावे, अशी मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT