dhule corporation
dhule corporation dhule corporation
उत्तर महाराष्ट्र

कोरोनापेक्षा धुळ्यात पाणीप्रश्न गंभीर

निखील सुर्यवंशी

धुळे : कोरोनापेक्षा शहरात पाणीप्रश्न अधिक गंभीर झाला आहे. याबाबत अनेक प्रभागातील स्थिती चिंताजनक आहे. विशेष सभा घ्या की सूचना द्या. नागरिकांना आठ ते दहा दिवसांआडही पाणी मिळत नाही. नागरिकांचे नगरसेवकांच्या निवासस्थानी मोर्चे सुरू झाले आहेत. येत्या काही दिवसांत पाणीप्रश्न सुटला नाही, तर आंदोलनासह अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देण्यास मज्जाव करू, असा इशारा संतप्त सदस्य नगरसेवकांनी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत दिला.

महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी (ता. १५) सकाळी अकरानंतर स्थायी समितीची सभा झाली. सभापती संजय जाधव अध्यक्षस्थानी होते. उपायुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेविका शीतल नवले, अमोल मासुळे, नागसेन बोरसे, अमिन पटेल, नगरसेविका किरण कुलेवार, पुष्पा गुजर, भारती माळी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरसेवकांची सरबत्ती श्री. नवले म्हणाले, की दोन वर्षांपासून वॉटर कन्सल्टंट नियुक्तीची प्रक्रिया भिजत पडली आहे. दर वर्षी २६ जानेवारी व १५ ऑगस्टला एक- दोन दिवसांआड पाणीपुरवठा करू, असे फसवे आश्‍वासन दिले जाते. श्री. मासुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत सत्ताधाऱ्यांना प्रशासनाची मदत होत नसल्याची खंत व्यक्त केली. श्री. बोरसे यांनी आक्रमक होत प्रभागात ११ दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याची तक्रार केली. तत्काळ पाणी मिळाले नाही, तर अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला.

राजीनामा देण्याची तयारी

नगरसेविका कुलेवार यांनी प्रभागातील लक्ष्मीनगर, जगदीशनगरात २१ दिवसांपासून पाणी नसल्याची तक्रार केली. यावर तत्काळ कार्यवाही झाली नाही, तर सदस्यपदाचा राजीनाम देईल, असा इशारा त्यांनी दिला. श्री. पटेल यांनी १५ दिवसांपासून पाणी नाही, परिसरात कचरा पडून आहे, बालकांना अतिसाराचा त्रास होत असल्याची तक्रार केली. श्रीमती गुजर, सौ. माळी यांनी पाणीप्रश्‍नी यंत्रणेची हजेरी घेतली. सभापती जाधव म्हणाले, की नगरसेवक आहेत, म्हणून नागरिक महापालिकेत येत नाहीत. त्यामुळे उद्रेक होऊ देऊ नका, अन्यथा प्रशासनाला नाहक त्रास होईल, असा गर्भित इशारा दिला.

अधिकाऱ्यांची अपेक्षा

शहर अभियंता कैलास शिंदे म्हणाले, की सर्व अभियंते, ओव्हरसियर शुक्रवारी (ता. १६) सकाळी सहापासून १५ दिवस फक्त पाणीप्रश्न सोडविण्यासाठी काम करू. मात्र, आमची कोरोनासह इतर दिलेली कामे कमी करावीत. सभागृहात उपस्थित झालेल्या व्हॉल्व्हमनने दोन महिन्यांपासून थकीत मानधनाचा मुद्दा मांडला. श्री. पटेल यांनी कोरोनाबाबत कामगिरीसाठी मनपाच्या कामाचे कौतुक केले. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रेमेडेसिव्हिर इंजेक्शन देण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली.

संपादन- राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

SCROLL FOR NEXT