dead body 
उत्तर महाराष्ट्र

मृतदेहावर अंत्‍यसंस्‍कार झाले; नंतर नातेवाईकांच्या शोधाशोधमुळे उघड झाला प्रकार

संदाशिव भालकर

दोंडाईचा (धुळे) : उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत झालेल्या रुग्णाच्या देहाची अदलाबदल झाल्याने एकच गोंधळ उडाला. मृतदेहाची शोधाशोध केली असता संबंधित मृतदेह दुसरेच घेऊन गेले अन् पालिका प्रशासनाच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कारही करून टाकले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडे केला. दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्टीकरणही या वेळी प्रशासनाने दिले. 
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (ता. १०) दुपारी ते सायंकाळदरम्यान उपचारार्थ दाखल शेवाडे (ता. शिंदखेडा) येथील ६७ वर्षीय पुरुष, तर दोंडाईचा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. मृतदेहावर स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली नियमांचे पालन करीत अंत्यसंस्कार करण्याचा पालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता.९) आदेश काढला आहे. ज्या भागाचा, गावांचा व्यक्ती मृत झालेला असेल तेथील ग्रामसेवक, पोलिसपाटील, तलाठी यांच्या ताब्यात मृतदेह देत गावीच अंत्यसंस्कार करावेत. 

शिल्‍लक मृतदेह कुणाचा..पाहिले तर
शनिवारी शेवाडे (ता. शिंदखेडा) येथील मृत पुरुषाच्या मृतदेहावर दोंडाईचा येथील नातेवाइकांनी आपला समजून पालिका प्रशासनाच्या देखरेखीखाली नियमांचे पालन करीत अंत्यसंस्कार केले. रविवारी (ता. ११) सकाळी शेवाडे येथील नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आलेत. तिथे त्यांचा मृतदेह शोधाशोध करूनही दिसून आला नाही. शिल्लक राहिलेला मृतदेह कुणाचा आहे. हे तोंड उघडून पाहिले असता तो मृत व्यक्ती दोंडाईचा येथील असल्याचे लक्षात आले. 

आदलाबदलने नातेवाईक संतप्त
संबंधित नातेवाईक यांना विचारले असता नोंद रजिस्टर पाहिले. त्यात मृतदेहावर अंतिम संस्कार केले गेले असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहाची आदलाबदल झाल्याचे समजताच आप्तस्वकीय संतप्त झाले. वातावरण बिघडू नये, यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ भूषण काटे, मनसेचे माजी नगरसेवक हितेंद्र महाले, जितेंद्र गिरासे यांनी आप्तस्वकीयांची समजूत काढली व दोषींवर कारवाई केली जाईल, असा विश्‍वास दिला. 

या पूर्वीही नगर परिषदेकडून अंत्यविधी केला जात होता. आता प्रत्येक मृतदेहाचे पॅकिंग करताना तोंड उघडे ठेवले जाईल. नाव, गाव, पत्ता, टाकला जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. 
- डॉ. भूषण काटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा 

येथील अमरधामची क्षमता चार अत्यंसंस्कारांची आहे. मृतांची संख्या जास्त असल्याने प्रतीक्षा वाढली होती. नातेवाइकांना जास्त वेळ थांबिविणे योग्य नव्हते. संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी स्थानिक प्रशासनाने नियमांचे पालन करून मृतांवर गावीच अंत्यसंस्कार करावेत, असे सूचित केले. मृतदेहाची अदलाबदल झाल्याबाबत दोषींवर कारवाई केली जाईल. 
- डॉ. प्रवीण निकम, मुख्याधिकारी, नगर परिषद, दोंडाईचा  

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT