animals confiscated 
उत्तर महाराष्ट्र

अवैधरीत्या जनावरे घेऊन जाणारा ट्रक जप्त; १६ गायींना जीवनदान

तुषार देवरे

देऊर (धुळे) : अवैधरीत्या निर्दयपणे वीस जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून पिंपळनेर पोलिसांनी बल्हाणे (ता. साक्री) शिवारात कारवाई केली. ट्रक जप्त करीत १६ गायींना जीवनदान दिले. 

पोलिसांनी कारवाई केल्‍यानंतर रात्री उशिरापर्यंत ट्रक (एमएच०३ सी.व्ही.०७५३) चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम पिंपळनेर पोलीस ठाण्यात सुरू होते. गुन्हा नोंद नंतर देऊर (ता.धुळे) येथील श्रीमती एम.एम.चतुरमुथा गोशाळेत वीस जनावरे संरक्षणासाठी दाखल केले. ट्रक मध्ये कोंबलेल्या वीस जनावरांपैकी एक बैल व १९गायींचा समावेश आहे. 

चार गायींचा मृत्‍यू
कोंबलेल्या गायींना श्वास घेणे जिकिरीचे होते. यात चार गायी मृत झाल्या. गोशाळेत मृत गायींचे विच्छेदन करून नेरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत निकम, परिचर आर. के. शेख यांनी पंचनामा केला. १६ जनावरांची आरोग्य तपासणी केली. यात दाखल प्रत्येक गायीच्या कानाला इनाफ प्रणालीनुसार टॅग लावण्यात आले. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार मनोज शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे. रात्री गोशाळेचे अध्यक्ष झुंबरलाल मुथा, कीर्ती मुथा, राजेंद्र मुथा उपस्थित होते. काल रात्रीच पदाधिकाऱ्यांना पिंपळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार श्री. शिरसाठ यांनी लेखी माहिती दिली. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत संस्थेच्या निगराणी जनावरे येथे राहतील. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT