valu vahtukdar 
उत्तर महाराष्ट्र

अवैध वाळू वाहतुकदारांकडून तलाठीस मारहाण

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास हटकल्याने तिघांनी तलाठीला मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकार तिसगाव ढंडाणे शिवारात रविवारी (ता. ३१) दुपारी बाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार संशयितांना अटक करून कडक कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी लेखणी बंद आंदोलन करतील असे निवेदन सोमवारी (ता. १) दुपारी राज्य तलाठी संघाच्या धुळे जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी व तहसीलदारांना दिले आहे. याप्रकरणी तलाठी विजय बेहरे यांनी देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात रविवारीच गुन्हा दाखल केला आहे. 

विजय बेहरे व सोनगीरचे तलाठी जितेंद्र चव्हाण हे शासकीय वसुलीच्या कामासाठी वडेलमार्गे कापडणे येथे जात असताना ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यास हटकल्याने चालक नितीन पाटील याने तलाठी बेहरेच्या उभ्या मोटारसायकलला ट्रॅक्टरने धडक देत दहशत निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मोबाईलने वसंत पाटील, किशोर पाटील, विकास पाटील यांना बोलावून घेत चौघांनी मारहाण व शिवीगाळ केली. याप्रकरणाचा राज्य तलाठी संघाच्या धुळे जिल्हा शाखेने तीव्र निषेध करीत महसूल व पोलिस खात्याच्या वरिष्ठांना निवेदन दिले. अशा गुंडप्रवृत्तीच्या वाळू तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा तसेच कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना संरक्षण मिळावे. 

गौणखनिज वाहणाऱ्यांवरील कारवाईवर बहिष्‍कार
संशयित गुंडावर कारवाई होत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन केले जाईल तसेच वारंवार अशा घटना घडत असल्याने जिल्ह्यातील सर्वच वाळू तस्करांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होत नाही तोपर्यंत अवैध गौणखनिज वाहणाऱ्यांवर कारवाई करण्यावर बहिष्कार टाकत आहोत असे निवेदनात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: विवाहित महिलेचा पतीसोबत वाद, सल्ला घेण्यासाठी खरातकडे गेली असता... ; अशोक खरातवर रात्री उशिरा गंभीर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : कऱ्हाडात बारा तासांची सिग्नल यंत्रणा; अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रायाेगिक पाऊल

Sangli Collector Transfer : सांगली जिल्हाधिकाऱ्यांची अचानक बदली, अशोक काकडेंच्या जागी तरूण व्यक्तीस संधी

Chhatrapati Sambhajinagar: सोळा लाखांचे दागिने घेऊन कारागीर पसार ; दोन सराफांसह घरमालकाला चुना

Chhatrapati Sambhajinagar: संतप्त रिक्षाचालक उतरले रस्त्यावर ; गॅससाठी रात्रीपासून रांगा लावाव्या लागल्याने संताप; पोलिसांनी केली मध्यस्थी

SCROLL FOR NEXT