crime news
crime news crime news
उत्तर महाराष्ट्र

शालक, साडूने घरात कोंडून मारले; मारहाणीत मृत्‍यू

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : पत्नीवर चारित्र्याचा संशयावरून नेहमी मारहाण करीत असल्याचा राग येऊन शालकाने व साडूनेच रजाळे येथे येऊन एकास घरात कोंडून मारहाण करीत खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोघांविरूध्द खूनाचा गुन्हा नोंदविला असून रामबोरीस (ता.धुळे) येथून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

रजाळे (ता. नंदुरबार) येथील रामचंद्र पितांबर पाटील (वय ४२) हे कुटुंबासोबत राहतात. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत नेहमी शिवीगाळ व मारहाण करीत असल्याच्या कारणावरून संतप्त होत रामचंद्र पाटील यांचे शालक शिवा वेडू गायकवाड व साडू समाधान पोपट देवरे हे दोघे शनिवारी दुपारी रजाळे येथे आले होते.

दोघांनी काढला पोबारा

रागाच्या भरात रामचंद्र पाटील यांना घरात कोंडून घेत लाठ्या-काठ्याने कपाळावर, दंडावर व पाठीवर, छातीवर व पोटावर बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन रामचंद्र पाटील यांचा मत्यू झाला. मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर दोघांनीही तेथून पोबारा केला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामळे मृत रामचंद्र पाटील यांच्या घराजवळ ग्रामस्थांची गर्दी झाली.

दोघा आरोपींना अटक

पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अरविंद पाटील ताफ्यासह घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी रामचंद्र पाटील हे मृतावस्थेत आढळले. त्यांनी पंचनामा प्रक्रिया सुरू केली. यावेळी मृत रामचंद्र पाटील यांचे वडील पितांबर पाटील यांनी आरोपींना तत्काळ अटक केल्याशिवय मृतदेहास हात लावू न देण्याची भूमिका घेतली. पोलस निरीक्षक अरविंद पाटील यांनी तत्काळ पोलिस पथक तयार करीत दोन्ही आरोपींना रामबोरीस (ता.धुळे) येथून अटक केली. रात्री उशिरापर्यंत पुढील पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT