nandurbar collector 
उत्तर महाराष्ट्र

विवाहासाठी आता लागणार परवानगीचे हमीपत्र

धनराज माळी

नंदुरबार : मंगल कार्यालय, लॉन्स व इतर सार्वजनिक तसेच खाजगी ठिकाणी होणारे लग्न व इतर समारंभासाठी ५ दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला लेखी स्वरुपात कळविणे आणि कोविड- १९ च्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याबाबत हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र भारुड यांनी यासंबंधितचे निर्देश दिले आहेत. 
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र परिस्‍थिती चिंताजनक निर्माण झाली असल्‍याने ठिकठिकाणी निर्बंध लावण्यात येत आहेत. त्‍या दृष्‍टीने नंदुरबारमध्ये देखील जिल्‍हाधिकारी यांनी निर्बंध लावले आहेत. यात आता लग्‍न समारंभ आणि इतर कार्यक्रमांसाठी परवानगीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

पाच दिवसांपुर्वी घ्‍यावी संमती
आयोजक तसेच संबंधित आस्थापना मालकांनी ५ दिवस आधी स्थानिक पोलीस स्टेशन, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांनी लेखी स्वरुपात कळविणे आवश्यक राहील. घरी होणाऱ्या कार्यक्रमांबाबत देखील आयोजकांनी ५ दिवसआधी लेखी स्वरुपात कळवून हमीपत्र देणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. 

तर दंडात्‍मक कार्यवाही
सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम व इतर मोठ्या प्रमाणात घेण्यात येणारे मेळावे, कार्यक्रम आदींना पोलीस विभागाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजक, संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण

Amazon Cloud Outage : ॲमेझॉन AWS वर ड्रोन हल्ला! UAE-बहारीन क्लाउड सेंटर ठप्प; भारतीय कंपन्यांसाठी चेतावणी, बँका-मोबाईल ॲप्स बंद

Farmers Protest : नांदगाव येथे महामार्ग रोको; आंबा-काजू बागायतदारांचा ‘वर्षा’वर धडक देण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : संभाजी नगरमध्ये वाहनांच्या गोडाऊनला आग

जगभरात गंभीर संकट, भारतासाठी चिंताजनक स्थिती; पण इंधन तुटवडा नाही; राज्यसभेत PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT