sarpanch 
उत्तर महाराष्ट्र

आली रे आली तारीख आली..सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार पुढच्या आठवड्यात

धनराज माळी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्राबाहेर येणाऱ्या शहादा तालुक्यातील ३५ व नंदुरबार तालुक्यातील ४१ अशा एकूण ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तालुकास्तरावर २९ जानेवारीला शहादा व नंदुरबार तहसील कार्यालयात काढण्यात येणार 
आहे. 
नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण ५१९ ग्रामपंचायती व अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायती अशा एकूण ५९५ ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील बिरसामुंडा सभागृहात काढण्यात येणार आहे. हे आरक्षण १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत सार्वत्रिक निवडणुका होऊन गठित होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी लागू असणार आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण काढताना घेण्यात येणाऱ्या सभेत सार्वजनिक आरोग्य विभाग, मदत व पुनर्वसन विभाग तसेच जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी वेळोवेळी दिलेल्या आरोग्यविषयक सूचना व आदर्श कार्यप्रणाली संहिता या बाबींचे पालन होण्याबाबत कटाक्षाने काळजी घेण्यात यावी, असे उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांनी कळविले आहे. 
 
संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘अँटी ड्रोन सिस्टीम’चा वापर; विनाकारण ड्रोन उडविणाऱ्यांवर होणार पोलिसांची कारवाई

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT