corona death
corona death corona death
उत्तर महाराष्ट्र

अर्ध्यावरच प्रवास थांबला..हावडा एक्‍स्‍प्रेसमध्ये घडली हृदयद्रावक घटना

राजेश सोनवणे

नंदुरबार : कोलकाता येथील कोरोना रुग्णाचा हावडा एक्स्प्रेसमध्‍ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नंदुरबार स्थानकात घडली. यामुळे त्या रुग्णांसमवेत प्रवास करणारी पत्नी आणि लहान दोन मुले पार हादरुन गेले. या सैरभैर झालेल्‍या परिवाराच्या मदतीला नंदुरबार रेल्वे स्थानकातील अधिकारी आणि कार्यकर्ते धावून आले. एवढेच नाही तर कोविड लागणीचा धोका पत्करत मृतदेह उचलत अंतिमसंस्कार करत परिवाराला सुखरुप परतीच्या प्रवासाला पाठविण्यात आले.

पत्‍नी याचनेसाठी धावतच निघली

पश्‍चिम बंगालमधील कोलकाता येथील रहिवासी आनंद कोदाड (वय ४२) हे अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेसने स्लीपर श्रेणीतून पत्नी सोमा आणि नैतिक व सहेली या दोन लहान मुलांसमवेत प्रवास करीत होते. अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेस नंदुरबार रेल्वेस्थानकात पोहोचली. तेव्हा सोमा कोदाड यांनी धावत येऊन रेल्वे कर्मचाऱ्यांना गाठले. कोरोनामुळे आजारी असलेल्या पतीची प्रकृती अत्यावस्थ झाली असल्याने तातडीने उपचार मिळवून द्या; अशा विनवण्या केल्या. तेव्हा नंदुरबार रेल्वेस्थानकावरील अधिकारी प्रमोद ठाकूर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी लागलीच कोदाड परिवाराला रेल्वे डब्यातून स्थानकात उतरवून घेतले. सॅनेटाईज करून गाडी पुढे रवाना करण्यात आली.

अन्‌ पत्‍नीला बसला धक्‍का

स्थानकावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासणी केली. तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद कोदाड हे मृत झाल्याचे घोषित केले. ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला. घरी परतण्याच्या प्रवासाला निघालेला पती अचानक जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याचे कळताच त्या महिलेवर जणू आकाश कोसळले. कोणीही परिचयाचे सोबत नसतांना अनोळखी गावात कोसळलेल्या या संकटसमयी काय करावे? लहान मुलांना सांभाळून आता पतीच्या मृतदेहाची पुढील गती कशी लावावी? असे एक ना अनेक प्रश्‍न त्यांच्यापुढे उभे राहिले. तथापि प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण धीर देत अभ्यागत कक्षात त्यांना बसवून धीर दिला.

त्‍यांनी दाखविली माणुसकी

केतन रघुवंशी आणि त्यांचे सहकारी घटना कळताच धावून आले. दुर्दैव असे की, कोरोना रुग्णाचा मृतदेह हाताळायला सर्व साधनांचा बंदोबस्त असलेला जाणकार आरोग्य कर्मचारी कोणीही उपस्थित नव्हता. कोविड रुग्णाचा मृतदेह असल्याने उपस्थित अन्य कोणीही हाताळायला तयार नव्हते. कोणतेही प्रतिबंधक बंदिस्त कपडे नसतांना केवळ हॅण्डग्लोज चढवून केतन रघुवंशी, प्रमोद ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत: मृतदेह उचलून स्ट्रेचरवर ठेवला. दोन नंबरच्या प्लाटफार्म ओलांडून रेल्‍वे स्थानकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणला. नंतर शासकीय रुग्णालयाला त्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची माहिती देत शववाहिनी मागवली. एवढेच नव्हे तर मृतदेह योग्य तऱ्हेने बंदिस्त करून अंतिमविधी उरकला.

अर्ध्यातून पत्‍नीचा पुढचा प्रवास

शिवाय प्रमोद ठाकूर यांनी सोमा कोदाड यांना मुलांसह सुखरुप कोलकाताला जाण्यासाठी परतीच्या प्रवासाची सोयही करून दिली. कोविड रुग्णाची हाताळणी करणे म्हणजे आपला जीव दावणीला बांधण्याची जोखीम माहित असतांनाही कोदाड परिवारावर अनाहूतपणे आलेल्या या संकटात माणुसकीचा हात पुढे करून मानवतेचे उदाहरण घालून दिले.

रेल्‍वे प्रशासनाबाबत अनेक प्रश्‍न

दरम्यान, नंदुरबार रेल्वे स्थानकावर प्रशस्त कोविड सेंटर नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. तरीही कोविड रुग्ण किंवा त्याचे शव वाहून नेण्यासाठी लागणारी पुरेशी साधने आणि कर्मचारी या घटनेप्रसंगी का उपलब्ध होऊ शकले नाहीत? असा प्रश्‍न केला जात आहे. एकीकडे रेल्वे प्रवासाला निघालेल्या रेल्वेप्रवाशांची स्थानकावरच तपासणी बंधनकारक करणारा आणि पॉझिटिव्ह व्यक्तींना प्रवासबंदी करणारा नियम जाहीर केला गेला आहे. मग हा प्रकृती खालावलेला कोरोना रुग्ण थेट अहमदाबादपासून इतक्या लांबचा प्रवास कसा काय करू शकला? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. रेल्वेस्थानकांवरील तपासणी व्यवस्थेवर यामुळे प्रश्‍नचिन्ह उमटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT