hunting of two leopards 
उत्तर महाराष्ट्र

गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची शिकार; लढविली होती शक्‍कल 

दिलीप गावीत

विसरवाडी (नंदुरबार) : चिंचपाडा (ता. नवापूर) वनक्षेत्रातील गडदाणी जंगलात दोन बिबट्यांची निर्घृणपणे शिकार करण्यात आली. मेलेल्या पशूच्या मांसात विषप्रयोग करून या दोन्ही नर व मादी बिबट्यांची शिकार करण्यात आल्याचा संशय वन विभागाला आहे. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिकारीनंतर दोन्ही बिबट्यांच्या अंगावरची कातडी काढण्यात आली असून, मोठे दात, मिश्या, त्यांचे चारही पंजेही कापून टाकण्यात आले आहेत. विक्रीसाठी पंजे आणि त्यांचे खाल काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 
१५ दिवसांपूर्वी मेलेल्या सात वर्षांच्या बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला होता. या संदर्भात वन विभागाने चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्‍थळी रविवारी (ता. २०) पंचनामा करून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांकडे चौकशी केली असता दुसरा बिबट्या मृतावस्थेत जमिनीत पुरल्याची माहिती समोर आली. त्या बिबट्याचे पुढील दोन पंजे तोडलेले दिसून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढून त्याचा पंचनामा करून पेटविण्यात आले. तिसरा मेलेल्या बिबट्या असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. परंतु वन विभागाला तिसरा दिसून आला नाही. 

वन विभागाची शोधमोहीम 
गडदाणीच्या जंगलात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. अनेक पशुधन फस्त केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्या अनुषंगाने काही लोकांनी बिबट्याला मांसात विषारी औषध टाकून मारण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या संदर्भात उपवनसंरक्षक सुरेश कवटे, सहाय्यक वनसंरक्षक डी. जी. पवार, वनक्षेत्रपाल चिंचपाडा आर. बी. पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पशुधन अधिकारी डॉ. योगेश गावित, मंडळाधिकारी बी. एन. सोनवणे, तलाठी जी. एस. तडवी, नवापूर चिंचपाडा, शहादा, नंदुरबार वन विभागाचा पन्नासहून अधिक कर्मचारीवर्ग घटनास्थळी दाखल होता. वन विभागाची जंगलात शोधमोहीम सुरू आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT