rapid test rapid test
उत्तर महाराष्ट्र

जळगाव पॅटर्न नंदुरबारमध्ये; विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड टेस्ट, निगेटिव्ह नागरिकांना दंड

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे.

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिस कर्मचारीही रात्रंदिवस खडा पहारा करीत असतानाही या ना त्या बहाण्याने रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पोलिस विभागाने रविवारी चांगलाच खाक्या दाखविला. पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी विनाकारण फिरणाऱ्यांना रस्त्यातच थांबवून कोरोना रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट केली. ज्या नागरिकांची टेस्ट पॉझिटिव्ह आली त्यांना कोविड सेंटरमध्ये व ज्यांची निगेटिव्ह आली त्यांना दंड ठोठाविला.

राज्य शासनाने सर्वत्र लॉकडाउन जाहीर केले आहे. त्याचबरोबर शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या अगोदरच ‘ब्रेक द चेन’साठी अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत. त्यांना नागरिकांचीही साथ मिळणे गरजेचे आहे. रविवारी (ता. १८) सकाळी अकराला लॉकडाउन काळात ज्यांना दुकाने सुरू करण्याची परवानगी नाही त्यांनी दुकाने उघडली. पोलिसांनी विचारणा करून तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली.

पकडला घरचा रस्ता

शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असला तरी या ना त्या बहाण्याने तरुणवर्ग शहरात मोटारसायकल घेऊन फेरफटका मारतात. दोंडाईचा रस्त्यावर शासकीय विश्रामगृह परिसरात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २० नागरिकांवर कारवाई केली. त्यात १८ पुरुष व दोन महिला यांचा समावेश होता. त्यांची कोरोना रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना मोहिदा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल. निगेटिव्ह आल्यास त्यांच्यावर पोलिसांत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली. दरम्यान, सकाळी पोलिसांच्या या कारवाईची वार्ता शहरात पसरताच काही रस्त्यांतून नागरिक माघारी झाले.

ज्यांना परवानगी आहे त्यांनीच दुकाने उघडी ठेवावीत. विनाकारण रस्त्यावर काम नसताना फिरू नये, मास्क लावणे सक्तीचे आहे. अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर निघावे. घरात राहणे अत्यंत सुरक्षित आहे. पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका.

- दीपक बुधवंत, पोलिस निरीक्षक, शहादा

संपादन- राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

मोदी सरकारचा मोठा निर्णय! Asia Cup 2025 स्पर्धेतील India vs Pakistan लढत होणार की नाही? फैसला झाला

‘धुरंधर’च्या टीमची तब्येत बिघडण्याचं खरं कारण समोर; सेटवरील जेवण नाही तर लेहमध्ये पसरलेलं मोठं फूड कंटॅमिनेशन

Stock Market Closing: शेअर बाजार वाढीसह बंद; सलग सहाव्या दिवशी तेजी, कोणते शेअर्स चमकले?

Bail Pola 2025: डिजेपासून बैलांना त्रास! शेतकऱ्यांना ‘ॲनिमल राहत’कडून १० सूचना

SCROLL FOR NEXT