nandurbar police nandurbar police
उत्तर महाराष्ट्र

पहिल्या ट्रकवर कारवाई नाही; अन्‌ तांदूळने भरलेला दुसरा ट्रक पकडला

पहिल्या ट्रकवर कारवाई नाही; अन्‌ तांदूळने भरलेला दुसरा ट्रक पकडला

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : चार दिवसांपूर्वी तांदळाने (Rice robbery) भरलेला ट्रक पकडला असून, त्याच्यावर चार दिवस उलटूनही कारवाई होत नाही तोच रविवारी (ता.१६) पुन्हा दोंडाईचाहून नंदुरबारकडे येणाऱ्या ट्रकमधून (एमएच २० ईजी ९१४६) तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक होत असल्याच्या संशयावरून काहींनी नीलेश लॉन्सजवळ तो अडविला. त्यात तांदूळ असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. यामुळे पोलिसांशी (Nandurbar police) संपर्क साधून ट्रक शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमा केला आहे. (nandurbar police action second truce seal in rice black market)

औरंगाबादकडून हा ट्रक गुजरातकडे जाणार होता. चार दिवसांत दोन ट्रक पकडण्यात आले. मात्र याबाबत पुरवठा विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते. चार दिवसांपूर्वी (ता.१३) ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ५४८१) दोंडाईचाकडूनच नंदुरबारकडे येत असताना नीलेश लॉन्सजवळच पकडत शहर पोलिस ठाण्यात जमा केला. दरम्यान, २ मेस शहादा तालुक्यातून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा एक लाख ५४६ किलो तांदूळ पोलिसांनी जप्त केला होता. या वेळी तांदळाची काळ्या बाजारात वाहतूक करणाऱ्यांकडून पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

काळ्या बाजारात की अन्य दुसरीकडे

टाळेबंदीच्या कालावधीत रेशनिंगच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री केल्यास कठोर कारवाईचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र असे असताना नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तांदळाची वाहतूक होत आहे. यामुळे हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जातो की इतर दुसरीकडे? याच्या चौकशीची मागणी होत आहे. नंदुरबार शहर पोलिस ठाण्याच्या आवारात जमा केलेला ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ५४८१) मध्ये ६२० इतक्या तांदळाच्या गोण्या असल्याचे समजले. मात्र पुरवठा विभागाकडून अद्यापही ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. दिवसभरात दोंडाईचा-नंदुरबार रस्त्याने किमान पाच ते सहा वाहनांनी तांदळाची वाहतूक होत असल्याचे बोलले जाते. हा तांदूळ कोठून आणला जात आहे व कोठे जात आहे, याची उकल मात्र होऊ शकली नाही. दिवसाआड अशी वाहने पकडली जात असल्याने काळ्या बाजारातील धान्याचे केंद्र शोधणे व सूत्रधाराचा तपास करणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT