railway isolation coach railway isolation coach
उत्तर महाराष्ट्र

रूग्णांअभावी नंदुरबारच्या रेल्वेकोच आयसोलेशनला कुलूप

रूग्णांअभावी नंदुरबारच्या रेल्वेकोच आयसोलेशनला कुलूप

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाने उग्ररूप धारण केल्यामुळे जिल्हा शासकिय रूग्णालयासह (Nandurbar civil hospital) खासगी हॉस्पिटल्समध्येही रुग्णांना बेड मिळणे दुरापस्त झाले होते. त्यामुळे योग्यवेळी उपचाराअभावी अनेक मृत्यूमुखी पडले. अशा स्थितीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड (Collector rajendra bharud) यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून उपलब्ध करून घेतलेले रेल्वेकोच आयसोलेशन (Railway isolation)आधार ठरले. मात्र योग्य नियोजनामुळे कोविड नियंत्रणा येत असल्याने आपोआपच रूग्णसंख्येत दिवसागणिक घट होत आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालयासह खासगी हॉस्पिटल्समध्येही मोठ्या प्रमाणात बेड रिकामे झाले आहेत.त्यामुळे रेल्वेकोच आयसोलेशन सेंटरकडे रूग्णत फिरकत नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे सर्वसोयंनीक्त हे सेंटर बंद पडले आहे. (nandurbar railway isolation center closed no patient)

कोरोना रूगणांची संख्या वाढल्याने १८ एप्रिलला नंदुरबार रेल्वे स्थानकावर आयसोलेशन सुरु करण्यात आले होते. गेल्या २१ दिवसात रेल्वे आयसोलेशनमध्ये ११९ रूग्णांवर उपचार केले. यातील ८७ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले. सध्या रुग्ण संख्या घटल्याने व रुग्णालयांमध्ये बेड रिकामे झाल्याने तूर्तास रेल्वे आयसोलेशन बंद करण्यात आले आहे. पुन्हा रुग्ण संख्या वाढल्यास रेल्वे आयसोलेशन सुरु करता येणार आहे.

जिल्ह्यात मार्च व एप्रिलमध्ये कोरोनाचा उद्रेक वाढला होता. त्यात रेमडेसिविर व ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त झाले होते. मिळविण्यासाठी भटकंती करावी लागत होती. दररोज ७०० ते ९०० कोरोना रुग्ण आढळून येत होते. उपचारासाठी दाखल रूग्णांची संख्या दहा हजारावर गेली होती. मात्र प्रशासनाने सातत्याने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या घटली. ती आता दररोज सरासरी १०० ते २०० वर आली आहे. त्यामुळे जिल्हा रूग्णालय व खाजगी दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेडस उपलब्ध आहेत. तीन आठवड्यापुर्वी जिल्ह्यात कोरोना वाढीमुळे रूग्णांना बेड उपलब्ध व्हावे व ऑक्सिजन मिळावे. यासाठी रेल्वे विभागाच्या मुंबई विभागात लाखो रूपये खर्च करून नंदुरबार येथे अद्ययावत रेल्वे कोविड आयसोलेशन कोच तयार केले होते. या २१ डब्यांचा कोचमध्ये ३७८ बेड रूग्णांसाठी उपलब्ध होते. या सुसज्ज असा आयसोलेशन कोचसाठी ५० लाखाहून अधिक खर्च झाला आहे.

अशी होती व्यवस्था

बाधितांचा उपचारासाठी १३ डॉक्टर, ब्रदर्स, वार्डबॉय आदी ४२ कर्मचारी कार्यरत होते. यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशाने ८ एप्रिलला येथे उपचार घेणाऱ्या २७ बाधीतांना शहरातील एकलव्य आयसोलेशन सेंटर येथे पाठविण्यात आले. याठिकाणी असलेले साहित्यही आरोग्य विभागाने नेत या रेल्वे कोचला कुलूप लावले. २१ दिवसात याठिकाणी ८७ जण कोरोनामुक्त झाले.

नंदुरबार रेल्वेस्थानकावर ही रेल्वेकोच १५ दिवस थांबणार आहे. रूग्ण वाढल्यास एका दिवसात पुन्हा तयार करण्यात येवून त्याचा वापर करण्यात येईल. जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी झाली आहे. त्यामुळे रूग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असल्याने जिल्हाधिकारींचा आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- डॉ.अभिजीत गोल्हार, नोडल ऑफीसर, रेल्वे आयसोलेशन कोच, नंदुरबार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट! पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

अकोल्यात हातात बांगड्या, ओठांवर लिपस्टिक... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणं पडलं महागात; टवाळखोराला अनोखी शिक्षा

'एसआयआर'मधून नाव वगळल्यास नागरिकत्व धोक्यात येईल का? सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, निवडणूक आयोगाला बजावली नोटीस

Cow Slaughter Case: जुन्नरमध्ये माई मोहल्ल्यात गोवंश कत्तलीवर पोलिसांची धडक कारवाई; २७० किलो गोमांस जप्त, आठ जणांवर गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT