nandurbar news 
उत्तर महाराष्ट्र

घबाड सापडल्याची चर्चा अन्‌ नवापूरमध्ये दोन घरांची झडती 

विनायक सुर्यवंशी

नवापूर (नंदुरबार) : शहरातील दोन सावकारांच्या घरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी (ता. ३१) झडती घेतली. झडतीत मोठे घबाड हाती लागल्याची चर्चा आहे. सावकारीच्या तक्रारीवरून दोघांची गुरुवारी (ता. ३१) सकाळपासून ते सायंकाळी सहापर्यंत कसून चौकशी करण्यात आली. संशयित सावकाराच्या घरातून एक कट्टा, रोकड, महत्त्वाचे दस्तऐवज जमा केले आहेत. 
येथील चार तक्रारदारांनी संशयित सावकाराविरुद्ध तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने गुरुवारी कारवाई करण्यात आली. एकाने १२ लाख, दुसऱ्याने पाच लाख, तिसऱ्याने दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. दर महिन्याला दहा टक्क्यांनुसार व्याजाची रक्कम वसूल करीत होते. व्याजाची रक्कम देण्यास विलंब झाल्यास सावकाराकडून शिवीगाळ व ठार करण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करण्यात आली होती. 
या तक्रारीच्या आधारे जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सहाय्यक उपनिबंधक रणजित पाटील, सहकार अधिकारी रत्ना मोरे, प्रकाश खैरनार, सुनंदा सामुद्रे, संगीता कोळी, कुणती पाडवी, हेमंत मरसाळे, शासकीय पंच सखाराम चौधरी, रुस्तम वसावे, किशोर पटेल आदींनी संशयितांच्या घराची झडती घेतली. संशयित सावकाराच्या घरातून एक कट्टा, रोकड, महत्त्वाचे दस्तऐवज जमा केले आहेत. पंचनामा करून संशयिताविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाडवी यांनी दिली. 

शहरात रंगली चर्चा 
नवापूर शहरात एका आठवड्यात दोनवेळा तीन घरांची झाडाझडती घेण्यात आल्याने अवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. शहरात कोट्यवधीचा सावकारी व्यवहार करणारे संबंधित विभागाच्या हिटलिस्टवर आहेत. शहरातील केवळ चार जणांकडे सावकारीचे परवाने आहेत. त्यापैकी तीन जणांनी परवाने नूतनीकरण केले आहेत. एकाचे बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. नवापूर शहरासह नंदुरबार जिल्ह्यात शेकडो सावकारी कारभार करीत असल्याचे बोलले जात आहे. यावरही संबंधित विभागाने अंकुश लावणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात कोणी अवैध सावकारांनी शेतकरी किंवा नागरिकांना कर्ज दिले असेल, कर्जाच्‍या रकमेपेक्षा जास्त रकमेची मागणी करीत असेल, तर अशा सावकारांविरुद्ध नंदुरबार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार करावी. 
-प्रताप पाडवी, प्रभारी जिल्‍हा उपनिबंधक, नंदुरबार 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Mystery: केतनच्या बहिणीनेच पकडला सियाचा खोटेपणा; अंत्यविधीनंतर आली होती भेटीसाठी, कुटुंब थेट पोलिस ठाण्यात

४,५०० वर्षे जुन्या मूर्तीला घातले कपडे ! NCERT च्या 'त्या' फोटोवरुन वाद; मूळ फोटो परत येणार का ?

प्रियकराच्या एका चुकीने सियाचा प्लॅन केला फेल; CCTVमध्ये पोलिसांना असं काय दिसलं? धक्कादायक माहिती समोर

Maharashtra Weather: मान्सूनने महाराष्ट्र व्यापला! सर्वदूर पावसाची शक्यता; १० जिल्ह्यांत मुसळधार, तर १५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Cow Urine for Chikungunya: चिकनगुनियावर गोमूत्र प्रभावी ठरू शकतं? IIT रुडकीच्या संशोधनात आश्चर्यकारक दावा समोर

SCROLL FOR NEXT