old age home 
उत्तर महाराष्ट्र

नसलेले वृद्धाश्रम कागदोपत्री चालतेय; सहा वर्षांपासून लाटताय अनुदान

धनराज माळी

नंदुरबार : कागदावर वृद्धाश्रम दाखवून केंद्र सरकारकडून जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादाने धुळे व कापडणे येथील दोन सेवाभावी संस्थांनी सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला. माहिती अधिकारात माहिती मागविण्यात आल्याने या वर्षाचे अनुदान न देता संबंधित कागदावर सुरू असलेले वृद्धाश्रम बंद करण्यात आल्याचे समजते. मात्र, सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांचे अनुदान कागदावर लाटणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे. 
२०१४ पासून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, मंदाणा, प्रकाशा (ता. शहादा), पातोंडा (ता. नंदुरबार) येथे केंद्रीय योजनेतून जिल्‍हा परिषद समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादाने वृद्धाश्रम सुरू करण्यात आले होते. वृद्धाश्रम केवळ कागदावरच सुरू होते. संबंधित गावांमध्ये एकाही ठिकाणी वृद्धाश्रम आढळून आलेले नाहीत. धुळे जिल्ह्यातील धुळे व कापडणे येथील दोन सेवाभावी संस्थांमार्फत हे वृद्धाश्रम चालविण्यात येत आहेत. 

आवश्‍यक कागदपत्रांचीही केली पुर्तता
या संस्थेने नंदुरबार समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादाने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली असून, समाजकल्याण विभागातील निरीक्षकांनी या संस्थेला वृद्धाश्रमाला अनुदान देण्याबाबत शेरा मारला आहे. त्यानंतरच हे अनुदान संबंधित वृद्धाश्रमाला अदा करण्यात आले आहे. मात्र, वृद्धाश्रम केवळ कागदावरच सुरू आहेत. तेथे वृद्धाश्रमाची इमारतच नाही, तर वृद्ध कोठून राहतील, अशी परिस्थिती आहे. 

कागदावर वृद्धाश्रम होते सुरू
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत माहिती मागविली असता, कारवाईच्या भीतीने २०२०-२१ चे अनुदान थांबविले असून, संबंधित संस्थाही बंद करण्यात आली आहे. तसेच कागदावर सुरू असलेले वृद्धाश्रम या वर्षी बंद केले आहेत. मात्र, गेल्या सहा वर्षांत संबंधित संस्थेने कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले आहे, त्यांच्याकडून हे अनुदान वसूल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित समाजकल्याण विभागातील निरीक्षकावरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT