rain with storm rain with storm
उत्तर महाराष्ट्र

नंदुरबार परिसरात वादळासह पाऊस; छताची पत्रे उडाली

नंदुरबार परिसरात वादळासह पाऊस; छताची पत्रे उडाली

राजेश सोनवणे

नंदुरबार : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार काही भागांत शनिवारी, तर काही भागांत आज (ता. १६) वादळासह पाऊस झाला. त्यात वादळामुळे (Storm) ग्रामीण भागात केळी, पपई पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले. पाऊस मात्र किरकोळ स्वरूपाचा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली. (nandurbar news rain with storm in nandurbar area)

हवामान विभागाने केरळचे वादळ मंबई व गुजरातमध्ये येईल, असा अंदाज वर्तविला होता. नंदुरबार जिल्हा गुजरातलगत असल्याने त्याचे पडसाद नंदुरबार जिल्ह्यातही उमटले. शनिवारी (ता. १५) दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सकाळी तप्त ऊन व नंतर उकाडा सुरू होता. त्यानंतर रात्री शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार वादळ आले. त्यात घरांच्या छताचे पत्रे उडाले होते, तर काही ठिकाणी केळी, पपईची झाडे उन्मळून पडून नुकसान झाले.

ऊन– सावलीचा खेळ

आजही दुपारी अचानक ऊन-सावलीचा खेळ सुरू होऊन भयंकर उकाडा होत असतानाच अडीचच्या सुमारास जोरदार वादळासह काही भागात जोरदार पाऊस झाला, तर काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या सरी कोसळल्या. नंदुरबार तालुक्याचा पश्‍चिम भागतील कोठली, नटावद परिसरात जोरदार वादळ व पाऊस झाला. त्यामुळे उन्हाळी ज्वारी, मका काढणीला आलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

Ebola Alert in India: इबोला फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; विमानतळांवर आफ्रिकन प्रवाशांसाठी कडक आरोग्य तपासणी लागू

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील अभंग प्रभू अकॅडमीमधील शिक्षक तेजस शहा याला सीबीआयकडून अटक

Taj Mahal History: ताजमहाल फक्त मुघलांचा की इराणचाही? अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या आग्रा दौऱ्याने उकरून काढला ५०० वर्षे जुना इतिहास

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

SCROLL FOR NEXT