corona yodha 
उत्तर महाराष्ट्र

कोरोना योद्धा म्‍हणून अविरत सेवा; पण कोरोनाच्या लागणनंतर मृत्‍यूची झुंज अपुर्ण

लोटन धोबी

शहादा (नंदुरबार) : येथील तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले कर्मचारी बापू पिरण पाटोळे यांनी कोरोनाच्या काळात कोरोना योद्धा म्‍हणून अविरत सेवा बजावली. अशात त्‍यांना कोरोनाची लागण झाली आणि महिनाभरापासून उपचार घेत असताना त्‍यांनी कोरोनाविरूद्धची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुर्ण पडली.

शहादा पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कार्यरत कर्मचारी बापू पिरण पाटोळे हे मार्च 2020 पासून कोरोना काळात अविरत सेवा बजावत होते. या काळात कुठल्याही प्रकारची रजा न घेता ते कार्यरत होते. परंतु 20 डिसेंबर 2020 ला त्यांना अचानक श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांनी सातपुडा कोविड हॉस्पिटल शहादा येथे कोविड चाचणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले. 

त्रास अधिकच वाढला अन्‌
कोविडवर औषधोपचार सातपुडा येथे घेत असतांना तब्येत अधिकच खालावत होती. म्हणून त्यांना सातपुडा येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी मल्टीस्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 3 जानेवारी 2021 पासून तेथे औषधोपचार सुरू होते. उपचार घेत असतांना 29 जानेवारीला अचानक दीर्घ स्वरूपात श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र त्‍यांची कोरोना विरूद्धची झुंज अपुर्ण पडली आणि 31 जानेवारीला कोविड प्रादुर्भावाने मृत्यूशी झुंज देताना त्यांची प्राणज्योत मालवली.

सेवापूर्तीला महिनाभराचा काळ
बापू पाटोळे यांनी आपल्‍या सेवेत अनेक विभागात काम बजाविले. आता आरोग्‍य विभागात काम करत असताना त्‍यांनी कोरोना योद्धा म्‍हणून आपली जबाबदारी चोखपणे सांभाळली. संपुर्ण नोकरीनंतर आता त्‍यांच्या सेवापूर्तीला केवळ एक महिना असतांनाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT