child death 
उत्तर महाराष्ट्र

चार लसींचा एकत्रित डोस; दोन महिन्‍याच्‍या बालकाचा मृत्‍यू

चार लसींचा एकत्रित डोस; दोन महिन्‍याच्‍या बालकाचा मृत्‍यू

सकाळ डिजिटल टीम

शहादा (नंदुरबार): बहीरपुर (ता. शहादा) येथील दोन महिने वयाच्‍या बालकाला आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary health center) अंतर्गत येणाऱ्या आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांनी बीसीजी, पोलिओसह एकूण चार लसींचा एकत्रितरित्या डोस दिला. यात बालक दगावल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत नंदुरबार जिल्हा भाजपा महिला (Nandurbar bjp) मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बहीरपुर व आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन दोषी असलेल्या अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना निलंबित करून त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. (shahada-primary-health-center-four-vaccine-one-dose-and-child-death)

बहिरपुर (ता. शहादा) येथील दानिश पवन खर्डे या दोन महिन्याच्या बालकाला आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका गंगा कैलास पवार, आरोग्य सेविका प्रमिला वाघ यांनी बीसीजी, पोलिओसह चार लसीचा डोस एकत्रितरीत्या दिला. त्यामुळे बालकाची स्थिती गंभीर झाली होती. त्याला उपचारार्थ आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. दरम्यान ७ जूनला बालक दगावल्‍याची घटना घडली.

भाजप महिला मोर्चाकडून कारवाईची मागणी

आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे दोन महिन्याच्या बालक दगावल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याची माहिती भाजपा जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस जयश्री चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश कार्यकारणी सदस्य कल्पना पंड्या, सीमा सोनगिरे, भावना लोहार, वंदनाबाई यांनी प्रथम बहिरपुर गावाला भेट देऊन दगावलेल्या बालकाच्या आई– वडिलांची भेट घेऊन सर्व महिला कार्यकर्त्यांनी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली संतप्त महिला कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्यानंतर महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी शहादा येथील तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देत जबाबदार असणाऱ्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्यावर कारवाई करून त्यांचा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अन्यथा नंदुरबार जिल्हा भाजपा महिला कार्यकर्त्या आंदोलन करतील असा इशारा निवेदनात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT