vahical 
उत्तर महाराष्ट्र

दंड न भरणाऱ्या वाहनांचा ३१ मार्चनंतर लिलाव 

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : वर्षभरात तालुक्यात परवानगी नसताना बेकायदेशीर गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्या विविध ३४ वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली असून, ३८ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. यापैकी २५ लाख ७५ हजार ३७५ रुपयांची रक्कम वसूल केली आहे. उर्वरितांना दंड भरण्याबाबत नोटिसाही बजावल्या आहेत. अद्याप दंडाची रक्कम न भरलेल्या वाहनांचा लिलाव करून दंड वसूल केला जाणार आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. 
तालुक्यातील गोमाई व इतर नदीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळूची वाहतूक केली जाते. वेळोवेळी महसूल विभागातर्फे त्या वाहनांवर कारवाई करून त्यांना आर्थिक दंड भरण्याबाबत नोटिसा बजावल्या जातात. काही महिन्यांत महसूल विभागाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली व ही वाहने तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यात जप्त करून ठेवली आहेत. दंडाची रक्कम भरण्याबाबत नोटिसा बजावल्यानंतरही अद्याप आठ वाहनचालक व मालकांनी सुमारे नऊ लाख ४९ हजार ५०० रुपये दंडाची रक्कम भरलेली नाही. दंड न भरणाऱ्या वाहनचालक- मालकांनी ३१ मार्चपर्यंत दंडाची रक्कम भरून आपली वाहने सोडवावीत, अन्यथा त्या वाहनांचा जाहीर लिलाव केला जाईल. लिलावात मिळालेल्या रकमेतून दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी दिला आहे. 

वाळूसाठाही जप्त 
वर्षभरात महसूल विभागातर्फे अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी पथके स्थापन करून विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथे ८७३ ब्रास वाळूसाठा जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला. त्यातून १७ लाख ६६ हजार ९५२ रुपयांचा महसूल मिळाला. टेंभे बुद्रुक येथेच दुसऱ्यांदा १८० ब्रास जप्त वाळू साठ्याच्या लिलावातून तीन लाख ६४ हजार ३२० रुपये महसूल मिळाला. वर्षभरात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या सुमारे ३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. 

अवैध गौणखनिज वाहतूक रोखण्यासाठी पथके स्थापन वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः भेटी देऊन कारवाई केली. या पुढेही अवैध गौणखनिज वाहतूक करताना आढळल्यास कारवाई केली जाईल. 
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा 

संपादन – राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे! पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; नाशिक, धुळे जळगावला रेड अलर्ट

Muslim Polygamy Case : मुस्लिम पुरुषांच्या बहुपत्नीत्वाला याचिकेद्वारे आव्हान, सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : कोयना-वारणा धरणांच्या विसर्गामुळे सांगलीत कृष्णा-वारणा नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढली

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

R. Ashwin: वैभव सूर्यवंशीला डच्चू, भुवनेश्वर कुमारला संधी; 2027 वर्ल्ड कपसाठी आर. अश्विनचा संभाव्य भारतीय संघ चर्चेत

SCROLL FOR NEXT