Prime Minister's Jeevan Jyoti Yojana Prime Minister's Jeevan Jyoti Yojana
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना काढणार प्रत्येक कुटूंबप्रमुखाचा विमा

शिवसेना काढणार प्रत्येक कुटूंबप्रमुखाचा विमा

सकाळ डिजिटल टीम

तळोदा (नंदुरबार) : येथील शहर शिवसेनेकडून (Taloda shiv sena) शहरातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाच्या विमा काढला जाणार असून पंतप्रधान जीवन ज्योती योजनेत (Prime Minister's Jeevan Jyoti Yojana) राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असलेल्या प्रत्येक कुटुंब प्रमुखास हा लाभ मिळवून देण्याचा निर्धार शहर शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभ घेण्याचे आवाहन शहरप्रमुख जितेंद्र दुबे यांनी केले आहे. (nandurbar-news-Shiv-Sena-will-take- insurance-for-every-family-head)

शहरात कोरोना या जागतीक महामारीत अनेक कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष अथवा महिलेला गमावले आहे. कर्त्या पुरुष अथवा महिलेला अकाली गमावल्यानंतर त्या कुटुंबाचे प्रचंड हाल देखील होत असतात. कुटुंबातील प्रमुख पुरुषाची किंवा महिलेची जागा कोणीही भरून काढू शकत नाही याची जाणीव ठेवून नागरिकांचा हा विमा काढला जाणार आहे.

शनिवारपासून सुरवात

त्यात कुटुंब प्रमुखांचा विमा काढला तर त्या कुटुंबाला भविष्यात आधार मिळेल. या हेतूने शहरातील प्रत्येक कुटुंबप्रमुखाचा पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत शिवसेनेचा स्वखर्चाने काढून देण्याच्या योजनेचा शुभारंभ खानदेशी गल्ली तळोदा येथे शनिवार १९ जूनपासून करण्यात येणार आहे.

हे कागदपत्र आवश्‍यक

संबंधीताचे राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असलेल्या पासबुकची छायांकित प्रत, ज्याच्या नावे विमा काढावयाच्या आहे; त्या कुटुंब प्रमुखाचे आधार कार्डची प्रत व विम्यासाठी वारसदार नोंदवण्यासाठी वारसदाराचे आधार कार्डची प्रत घेऊन या योजनेच्या लाभ शहरातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार शिवसेनेचे शहर प्रमुख जितेंद्र दुबे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT