crime 
उत्तर महाराष्ट्र

बहिणीचा नवराच ठरला खुनी; दुचाकीसाठी शालकाच्या डोक्‍यात घातला दगड

फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : तालुक्यातील कढेल फाट्याजवळ झालेल्या खुनाच्या घटनेच्या पोलिसांनी एका दिवसात छडा लावला असून सख्या मेहुण्याने खरेदीची दुचाकी स्वतःकडे ठेवण्याचा कारणावरून शालकाच्या खून केल्याचा प्रकार घडला आहे. घटनेतील मृताचे नाव आकाश शंकर वसावे (वय १७, रा. रोजवा पुनर्वसन) असे असून नात्याने मेहुणा असलेल्या भुरजी हुरजी पावरा (वय २०, रा. रेवानगर) याने खून केल्याची कबुली दिली आहे. घटनेतील संशयित आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. 
तळोदा - बोरद रस्त्यावरील कढेल फाट्याजवळ पपईच्या बागेत सोमवारी सकाळी दहाला खुनाची घटना उघडकीस आली होती. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपासाची चक्रे फिरवली होती. स्वतः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सायंकाळपासून तळोदा पोलिस स्टेशन येथे उपस्थित राहत तपासाची सूत्रे हलवली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तपासाला गती देत दोन- तीन संशयितांना ताब्यात घेतले. 

दोघांमध्ये झाले भांडण अन्‌
संशयितांकडे विचारपूस करून पोलिसी खाक्या दाखवताच सुगावा लागला. रेवानगर येथील भुरजी पावरा याने गुन्हा घडल्याची कबुली दिली. नात्याने मेहुणा व शालक असलेल्या भुरजी पावरा व आकाश वसावे यांनी नंदुरबार येथून दुचाकी विकत आणली होती. त्यावरून भुरजी वसावे याची नियत बिघडल्यामुळे दुचाकी कोणाकडे राहणार यावरून दोघांचे भांडण झाले. त्यातुन हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी भुरजी पावरा याला अटक केली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. 
 
पोलिसांकडून एका दिवसात तपास 
दरम्यान या तपासात स्वतः पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सहा तासाहून अधिक काळ पोलिस स्टेशनमध्ये थांबून आरोपींना पकडण्यात मोठी भूमिका बजावली. त्यात पोलिस निरीक्षक नंदराज पाटील, साहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे, अभय मोरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक गोरे, स्थानिक हेड कॉन्स्टेबल युवराज चव्हाण, अजय पवार, रवींद्र कोराळे यांनी तपासाला गती देऊन एकाच दिवसात गुन्ह्याचा छडा लावल्याने पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT