crime sakal
उत्तर महाराष्ट्र

अंगणात सरडा फेकल्‍याचा संशय; वहिनीवर कुऱ्हाडीने वार

अंगणात सरडा फेकल्‍याचा संशय; वहिनीवर कुऱ्हाडीने वार

सकाळ डिजिटल टीम

तळोदा (नंदुरबार) : मेलेला सरडा घरासमोरील रस्त्यावर टाकल्याच्या राग येत गढावली (ता. तळोदा) येथील सुभाष पवार याने चक्क वहिनी सुपडीबाई पवार हिच्यावर कुऱ्हाडीने (Crime news) वार करत गंभीर जखमी केले. जखमी सुपडीबाई पवार हिच्यावर शहादा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (crime news attacked with an ax)

पोलीसात फिर्यादी सुपडीबाई किसन पवार (वय ३५, रा. गढावली ता. तळोदा) व आरोपी सुभाष वाऱ्या पवार (वय ३०) यांचे समोरासमोर घर आहे. सुपडीबाई पवार व सुभाष पवार यांच्यात वहिनी- दिराचे नाते असून ते एकमेकांच्या घरासमोर राहतात. बुधवारी (ता. १९) सुभाष पवार यांना आपल्या घरासमोरील रस्त्यावर मेलेला सरडा दिसला. सुपडीबाई पवार यांनीच मेलेला सरडा रस्त्यावर टाकला असे गृहीत धरुन मागील भांडणाची कुरापत काढत सुभाष पवार याने सुपडीबाई पवार यांना मारहाण करीत त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

जखमी अवस्‍थेत नेले रूग्‍णालयात

सुपडीबाई पवार यांच्या डोक्यात, बगल, हात व छातीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी सुपडीबाई पवार यांना तळोद्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर औषधोपचार करीत पुढील उपचारासाठी त्यांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या सुपडीबाई पवार यांच्यावर शहाद्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सुभाष पवार यांच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत असून आरोपी सुभाष पवार यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT