lockdown 
उत्तर महाराष्ट्र

उपविभागीय पोलिस अधिकारी उतरले रस्‍त्‍यावर; वाहनधारकांची धरपकड 

सकाळवृत्तसेवा

तळोदा (नंदुरबार) : शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी खुद्द पोलिस उपविभागीय अधिकारी श्रीकांत घुमरे रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळाले. त्यामुळे विनाकारण शहरात फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच चपराक मिळाली असून पोलिसांनी ठिकठिकाणी धरपकड सुरू केली आहे. दुसरीकडे नगरपालिकेने शहराच्या प्रवेश मार्गावर बेरीकटिंग करून रस्ते बंद केले आहेत. त्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी घरातच थांबून प्रशासनास सहकार्य करण्याचे केले आहे. 
जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती भयावह आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ते रविवार असा चार दिवसाच्या जनता कर्फ्यू ठेवलेला आहे. जनता कर्फ्यूत केवळ औषधाची दुकाने व दवाखाने सुरू आहेत. त्यात वैद्यकीय कारणांसाठी गावात येणाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. तरी देखील अनेक महाभाग विनाकारण शहरात फिरत असतात. त्यामुळे देखरेख ठेवण्यासाठी पोलिस पथक २४ तास नजर ठेवून आहेत. 

बसला वचक
शुक्रवारी शहरात स्मारक चौकात उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे, उपनिरीक्षक अभय मोरे व पोलिस कर्मचाऱ्यांनी विनाकारण गावात फेरफटका मारणाऱ्या वाहनधारकांना तंबी दिली. त्यात प्रत्येकाजवळ ओळखपत्र आहे की नाही हे देखील तपासण्यात आले. ओळखपत्राशिवाय फेरफटका मारणाऱ्यांना जाब विचारत वैद्यकीय कारणास्तव फिरत आहेत अथवा नाही याचीही तपासणी केली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर वचक बसला. 

ठिकठिकाणी कारवाई
दुसरीकडे नगरपालिकेने शहरातील प्रवेश मार्गांवर बॅरिकेटिंग करून रस्ते बंद केले आहे. कॉलेज रस्त्यावरील हुतात्मा चौक, चिनोदा चौफुली, हातोडा रोड आदी ठिकाणी बॅरिकेटिंग केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश लागेल असे सांगितले जात आहे. तर सोमवार ते बुधवार चिनोदा रोडवरील मोकळ्या जागेवर भाजीपाला मार्केट व इतर विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा मिळणार असल्याने तेथेदेखील पालिका प्रशासन अधिकारी राजेंद्र माळी, आरोग्य निरीक्षक अश्विन परदेशी, स्वच्छता निरीक्षक अजय गोजरे यांनी पाहणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore Solapur : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपचा ‘प्लॅन’ ठरला? जयकुमार गोरे काय म्हणाले?

Tata Sons N Chandrasekaran : टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून वाद; चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्टचा विरोध

'खीर बनवणाऱ्यालाच आधी चाखावी लागते!' ‘सूर्यवंशम’चा उल्लेख करत गौरव कपूरने बिग बींची घेतली फिरकी, Viral Video

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये लाचखोरीप्रकरणी कृषी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

SCROLL FOR NEXT