Taloda stadium Taloda stadium
उत्तर महाराष्ट्र

लोकार्पण होऊन चार वर्ष; तळोदा संकुलाला खेळाडू पोरके

लोकार्पण होऊन चार वर्ष; तळोदा संकुलाला खेळाडू पोरके

सम्राट महाजन

तळोदा (नंदुरबार) : लोकार्पणाच्या चार वर्षानंतरही तळोदा क्रीडा संकुलाला (Taloda stadium) खेळाडू पोरके आहेत. क्रीडा संकुलाचा वापर होत नसल्याने ते धूळखात असून दिवसेंदिवस त्याची दुरवस्था होत आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने क्रीडा संकुल तयार केले तो उद्देशच सफल झाला नसल्याने क्रीडाप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. संकुल तयार करण्यासाठी सुमारे १ कोटी रुपये लागले असून एकंदरीत परिस्थिती पाहता ते पाण्यात गेले असेच म्हणावे लागत आहे. (taloda-stadium-opening-four-year-but-not-use-sportsman)

शहर व तालुक्यातील खेळाडूंना एकाच छताखाली अनेक खेळ उपलब्ध व्हावेत, ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांनी क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवावे, या हेतूने तत्कालीन मंत्री पद्माकर वळवी यांनी तालुका क्रीडा संकुलाला मंजुरी मिळवून दिली होती. त्यानंतर तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी (EX MLA udesingh padvi) यांनी पुढाकार घेत शहरातील आयटीआयमागे क्रीडा संकुलाची इमारत उभारण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे क्रीडा संकुल तयार होत १० जून २०१७ रोजी तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत संकुलाचे लोकार्पण झाले होते. मात्र लोकार्पण होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले झालेले नाही.

संकुलाची दुरवस्था

सध्या या क्रीडा संकुलाच्या कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे संकुलाच्या आतील भागात पक्ष्यांनी आपले घरटी बनवली आहेत. ठिकठिकाणी जाळं पसरलेलं असून संपूर्ण वास्तू हळूहळू काळवंडत आहे. पाण्यासाठी केलेल्या पाइपलाइन ठिकठिकाणी तुटल्या आहेत. संकुलालगतच्या जागेवर खो-खो व कबड्डी खेळाची मैदाने तयार होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता तिथे कचरा व शेणाचे साम्राज्य दिसून येते. या परिसराला खेळाच्या मैदानाची अजूनही प्रतिक्षाच आहे. वापराविना संकुलाचा परिसर अतिशय भकास झाला आहे.

एक कोटी रुपये वाया?

चार वर्षे झालीत तरी मैदानाचा विकास झाला नाही की कुंपण नाही, अशी अवस्था क्रीडा संकुलाची झाली आहे. खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढून नवीन खेळाडू तयार व्हावेत व आरोग्यदायी नवीन पिढी तयार व्हावी यासाठी क्रीडा संकुल असताना एकंदर परिस्थिती लक्षात घेता संकुलाचेच आरोग्य बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाचा सुमारे एक कोटी रुपये वाया जाण्याचीच भीती व्यक्त करण्यात होत आहे.

सिस्टिमचा इंटरेस्ट संपला

क्रीडा संकुलसारख्या भव्य इमारती तयार करण्यासाठी शासनाचा मोठा निधी खर्च होतो. सर्व सिस्टिम (यंत्रणा) क्रीडा संकुल सारखी एखादी वास्तू तयार करण्यासाठी जो उत्साह व इंटरेस्ट दाखविते, त्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ती वास्तू उपयोगात आणण्यासाठी तोच उत्साह व इंटरेस्ट दाखवत नाही, हे तितकेच खरे आहे. कारण वास्तू तयार झाल्यानंतर त्यामधील सिस्टिमचा इंटरेस्ट संपलेला असतो असे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT