Shahada nagar palika
Shahada nagar palika Shahada nagar palika
उत्तर महाराष्ट्र

शहाद्याच्‍या तीन नगरसेविकांनी बांधले हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : शहादा येथील तीन नगरसेविकांनी (Shahada nagarpalika corporators) व जिल्ह्यातील काही संरपंच- उपसरपंचांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय गाठत राष्‍रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President of Nationalist Congress Party Jayant Patil) यांच्या हस्ते व नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शहाद्यात खळबळ उडाली आहे. (nandurbar-news-Three-corporators-Shahada-join-NCP)

नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हध्यक्ष डॉ. अभिजित मोरे व त्यांचा पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनची मोट बांधणीस जोरदार सुरूवात केली आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा बैठका, पदाधिकारी निवड व नियुक्ती आणि सामाजिक कार्याला वेळ दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्ह्यात संघटन चांगले होत असतांनाचे चित्र आहे. त्याची फलश्रृती म्हणजे शहादा येथील तीन नगरसेविका व जिल्ह्यातील काही सरपंचांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नाना महाले उपस्थित होते.

भाजप, एमआयएम नगरसेविकांचा समावेश

शहादा नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका सहीदा बी. अन्सारी, एमआयएमच्या नगरसेविका तथा शिक्षण सभापती सैय्यद सायरा बी. अली लियाकत अली, कॉंग्रेस नगरसेविका सुमन पवार यांच्यासह सपना शेवाळे, बुधा ठाकरे, ईश्वर ठाकरे, संग्राम ठाकरे, शंकर वाघ, अनुबाई सोनवणे, भिवाजी ठाकरे, सुरेश ठाकरे, गोवर्धन ठाकरे, कैलास पवार, महेंद्र शेवाळे, सुनील पवार, रविंद्र पडवी, भरत ठाकरे, सुभाष शेवाळे, भुपेंद्र पवार, संतोष शेवाळे, रविंद्र ठाकरे, गणेश भिव यांनी यावेळी पक्षप्रवेश केला.

राजकिय वर्तुळात खळबळ

तीन नगरसेविकांमध्ये सहीदा बी अन्सारी या नगराध्यक्ष मोतीलाल पाटील गटाच्या होत्या.तर सुमन पवार या दीपक पाटील गटाच्या होत्या तर सैय्यद सायरा बी अली लियाकत अली या एमआयएमच्या असल्या तरी त्यांचा सत्ताधारी मोतीलाल पाटील गटाला समर्थन होते. या तीन नगरसेविकाच्या प्रवेशाने शहाद्याचा राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुन्हा एक नगरसेवक मार्गावर

शहादा येथील कॉंग्रेसचा एक नगरसेवकाची गेल्या काही महिन्यापासून घुसमट सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत बऱ्याचदा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहिर प्रवेश करण्याचे नियोजन केले. मात्र नियोजन चुकले. आता योग्य मुहुर्तावर तेही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत; अशी माहिती सुत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

Justin Bieber: लग्नाच्या सहा वर्षानंतर जस्टिन बीबर आणि हेली होणार आई-बाबा; खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Latest Marathi News Live Update : रवींद्र धंगेकर यांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकास भोवलं

द्रविड सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? BCCI नव्या गुरुच्या शोधात

'भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा, नाहीतर ते अणुबॉम्ब टाकतील'; काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वाद

SCROLL FOR NEXT