world eye donation day world eye donation day
उत्तर महाराष्ट्र

कोरोनामुळे मरणोत्तर नेत्रदानास प्रतिसाद शून्य

कोरोनामुळे मरणोत्तर नेत्रदानास प्रतिसाद शून्य

सकाळ डिजिटल टीम

नंदुरबार : अन्नदान, कन्यादान, रक्तदान, देहदानाप्रमाणे नेत्रदानही तितकेच महत्त्वाचे आहे. दीड वर्षांपासून कोरोनामुळे (Coronavirus) मरणोत्तर नेत्रदानास शून्य प्रतिसाद मिळाला. अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश येण्यासाठी मरणोत्तर नेत्रदान (world eye donation day) करण्यासाठी इच्छुकांनी संकल्प अर्ज भरण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीने केले आहे. (nandurbar-news-world-eye-donation-day-no-response-eye-donation-corona)

वयाच्या अटीमुळे नेत्रदानाचे प्रमाण घटले असून, आकस्मिक, अपघात, आत्महत्या, विषप्राशन आदी कारणामुळे मृत्यू झाल्यास नेत्रदानासाठी (eye donation) नातेवाइकांचे समुपदेशन आणि जनजागृतीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीतर्फे जिल्हा निर्मितीच्या आधीपासून जनजागृती व प्रबोधन सुरू आहे. आतापर्यंत शंभराहून अधिक दात्यांनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे नेत्रदान चळवळीला बळ मिळाले आहे. समितीतर्फे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या दात्यांच्या नातेवाइकांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो.

संकल्‍प आवश्‍यक

नेत्रदानासाठी संकल्प करणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा संकल्प करून व नातेवाइकांकडून तो पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करावी. यासाठी लेखी संकल्पपत्र भरून त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेणे आवश्यक असते. मृत व्यक्तीचे नातेवाईक नेत्रदानासाठी संमती देऊ शकतात. इच्छुकांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प अर्जासाठी नंदुरबार जिल्हा सार्वजनिक समितीचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष सुरेश जैन, सचिव डॉ. अर्जुन लालचंदाणी, महादू हिरणवाळे, श्रीराम दाऊत खाने यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT