उत्तर महाराष्ट्र

खाद्यतेलाचा 2500 किलो साठा जप्त 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत दिवाळी सणानिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. खाद्यतेल, रिपॅकर, घाऊक विक्रेते यांचेकडुन शहरात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी 13 नमुने घेतले आहे. 3 खाद्य तेल आस्थपनांकडील सुमारे 2500 किलोग्रॅम इतका शेंगदाणा तेल, आर. बी. डी पामोलिन तेलाचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. 

खाद्यतेलाच्या भेसळी प्रकरणी घेण्यात आलेले नमुने अन्न विश्‍लेषकांकडे विश्‍लेषणाकरिता पाठविण्यात आले असून विश्‍लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यो. कों. बेंडकुळे यांनी दिली. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने त्या पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्‍यता असते. त्यासंदर्भात देखील अन्न व औषध प्रशासनामार्फत अंकुश ठेवण्यात आला असून शहरातील विविध आस्थापनामधून मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थाचे नमुने विश्‍लेषणासाठी घेण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल विक्रेते व इतर किरकोळ विक्रेत्यांवर 64 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या असून खाद्यतेल, तूप, मिठाई, बेसन या अन्न पदार्थांचे भेसळीच्या संशयावरून 52 नमुने घेण्यात आलेले आहे. 

ग्राहकांनी घ्यावी काळजी 
प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की, शिळी, स्वस्त दरातील, रंगीत, हलक्‍या दर्जाची मिठाई तसेच इतर अन्नपदार्थ पारखून घ्यावेत. तसेच मावा, खवा, मिठाई घेताना विशेष काळजी घ्यावी, मिठाईचे सेवन आठ तासाच्या आत करावे. पॅकबंद पदार्थांची खरेदी करताना त्याचा समूह क्रमांक व उत्पादन तिथी तपासून खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करताना विक्रेत्याकडून खरेदी बिल घ्यावे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT