sakal exclusive 
उत्तर महाराष्ट्र

देवळीच्या अभियंत्याचा नायजेरियात कोरोनाने मृत्यू; पत्नीलाही कोरोना मृत्यूशी देतेय झुंज 

सकाळवृत्तसेवा

अमळनेर : देवगाव- देवळी (ता. अमळनेर) येथील मूळ रहिवासी असलेल्या 46 वर्षीय अभियंत्याचा नायजेरियात सोमवारी (ता. 20) रात्री कोरानाने मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून, त्या नायजेरियातील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. 

देवळी येथील मुळ रहिवासी असलेले दाम्पत्य गेल्या सोळा वर्षापासून नायजेरियात स्थायीक आहेत. एका कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर नायजेरियात औषधोपचार सुरू होते. मात्र, काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती त्यांच्या पत्नीस नायजेरीयातील डॉक्‍टरांनी दिली. त्यांच्या पत्नीने धुळे येथे त्यांच्या नातलगांना भ्रमणध्वनीवरून मृत्यूबाबत कळविले असून, ही माहिती मिळताच त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मागे पत्नी, आई, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी गोवा येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून, सध्या लॉकडाऊनमुळे नाशिक येथे मावशीकडे आली आहे. 

पत्नीही देतेय झुंज 
नायजेरीया येथे स्थायीक झालेले मराठी दाम्पत्य कोरोनाग्रस्त झाले आहे. पती- पत्नी दोघेच घरात असतात. मुलगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गोव्यात असते. लॉकडाउनमुळे त्यांना गावाकडे देखील येता येणे शक्‍य झाले नाही. यात देवळीचा अभियंता असलेल्या इसमास कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली असून त्या देखील मृत्यूशी झूंज देत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली १५ वर्षांची भारतीय नेमबाज अखेर सापडली! पोलीस तपासात कोणतं कारण समोर आलं?

Success Story: 1.5 लाखांची मुंबईतील नोकरी सोडून गावाकडे आला; आता महिन्याला कमावतोय 4 लाख रुपये! काय आहे गुंतवणुकीचा मंत्र?

Latest Marathi News Live Update : रामभक्तांवर रामरक्षा करण्याची वेळ भाजपानं आणली - उद्धव ठाकरे

Tukaram Mundhe : 'एआय'च्या मदतीने अन्नभेसळखोरांवर नजर! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा इतिहास मिळणार एका क्लिकवर

Car Accident : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; परभणी जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT