उत्तर महाराष्ट्र

Loksabha 2019 : देशविरोधी ताकदीला मदत करणाऱ्यांना घरी बसवा ः मुख्यमंत्री फडणवीस 

उमेश काटे

अमळनेर ः कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे म्हटले आहे. अशा देशविरोधी ताकदींना मदत करणाऱ्यांना घरी बसविण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचारार्थ प्रताप मिल कंपाऊंडमध्ये झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सभेला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी केंद्रीयमंत्री एम. के. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ आदी उपस्थित होते. 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची आहे. अमेरिका, इस्त्राईलनंतर भारत हा ताकदीचा देश बनला आहे. पुलवामा घटनेतील शहिदांच्या रक्‍ताचा बदला बालोकोट येथे झालेल्या हल्ल्यातून पूर्ण केला. अमळनेर तालुक्‍यातील जिव्हाळ्याचा पाडळसे प्रकल्प नाबार्डच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कॉंग्रेसने पाच पिढ्यांपासून गरीबी हटावाचा नारा लावला आहे. आता राहुल गांधी काय खाऊन गरिबी हटवणार आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन सुरवातीला पॅड बांधून म्हाडाच्या मैदानात उतरले. मात्र, बाराव्या दिवशी त्यांनी माघार घेऊन निवृत्त होण्याची घोषणा केली. कॅप्टनच खेळायला तयार नसेल तर त्यांचे उमेदवार आमच्या पुढे काय लढतील असा मुद्दा देखील त्यांनी यावेळी मांडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Ravikiran Ingawale : 'शरद कोराणे यांना कारागृहात इंजेक्शन देऊन संपवलं...'; रविकिरण इंगवलेंच्या व्हायरल ऑडिओमुळे खळबळ, कोराणे कुटुंबाची सखोल चौकशीची मागणी

ZP School Mathjalgav: पाच वर्गखोल्या धोकादायक, १२५ विद्यार्थ्यांसाठी एकच खोली; मठजळगावच्या शाळेची दुरवस्था

Latest Marathi News Live Update : 'मला हनुमानाने वाचवले': पंतप्रधान मोदींशी संवाद साधताना स्मित मच्छार यांनी भगवद्गीतेचाही केला उल्लेख

Purnekar Murder Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंचा मोठा खुलासा; राजकीय दबावाचा आरोप, पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT