covid center 
उत्तर महाराष्ट्र

अमळनेरला कोरोना कोविड केअर सेंटर सज्ज

उमेश काटे

अमळनेर : तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रताप महाविद्यालयाच्या लेडीज हॉस्टेल मध्ये कोरोना कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यक सुविधांसह 200 बेडचे नियोजन करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये सौम्यस्वरुपाच्या आजारांचे रुग्ण दाखल करण्यात येणार असून त्यांचे स्वॅबही याचठिकाणी घेतले जाणार आहे. यामुळे रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यात कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. आता पर्यत तालुक्यात 18 कोरोना बाधित रुग्ण असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाहिले कोविड सेंटरच स्थापन करण्यात आले आहे. याठिकाणी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधी साठा उपलब्ध आहे. तालुकास्तरावर करोना कोविड केअर सेंटरमार्फत रुग्णांचा चांगले उपचार व व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी व्यवस्थापन समिती नेमण्यात आलेली आहे. याठिकाणी पालिकेतर्फे पाण्याची सोय व साफसफाईची सोय करण्यात येणार असुन रुग्णांना जेवण्याची सोय करण्यात येत आहे. सद्यस्थितीत 38 जणांना  विलगीकरण करण्यात आले आहे. दरम्यान प्रताप महाविद्यालयातील वस्तीगृहातील कोविड केअर सेंटरची पहाणी प्रांताधिकारी सीमा अहिरे,  तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे, उपमुख्यअधिकारी संदीप गायकवाड यांनी केली.

केअर सेंटरमध्ये कार्यरत कर्मचारी
सद्यस्थितीत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताळे व डॉ संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 'आरबीएसके'चे डॉ गणेश पाटील, डॉ तनुश्री फडके, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सूर्यवंशी, डॉ पूजा बागुळे, डॉ निलेश सोनवणे, डॉ मोहसिन पटेल,आरबीएसके'चे एएनएम पुनम नारे, सुवर्णा राजपूत, अंमळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आधीपरिचारिका श्रीमती एल व्ही चौधरी, नीना साळुंखे, अमळनेरच्या आधीपरिचारिका दिव्याभारती साळुंखे, मीनाक्षी परदेशी, 'आरबीएसके' चे औषध निर्माता गिरीश शिंदे, वैशाली पाटील हे 24 तास शिफ्ट ड्युटीमध्ये कार्यरत असणार आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वस्तीगृहात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे तसेच कोविड सेंटर च्या स्वच्छतासाठी तसेच इतर सुविधा सोई सुविधा पुरवण्यासाठी प्रांताधिकारी यांनी पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना सहकार्यासाठी स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, मुकादम अनिल बेंडवाल यांच्यासह बारा सफाई कर्मचाऱ्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ केली आहे. यात इस्लामपुरा चा समावेश करण्यात आला आहे. शहरात कोरोना कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. आवश्यक सुविधांसह 200 पैकी 130 बेड तयार करण्यात आले आहे. माजी आमदार साहेबराव पाटील यांनी या सेंटरसाठी 100 गादी भेट दिल्या आहेत. त्यांचे प्रशासनाकडून आभार. 
-मिलिंदकुमार वाघ, तहसीलदार, अमळनेर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT