corona gudhi 
उत्तर महाराष्ट्र

कोरोना वरची "आरोग्य संरक्षक गुढी" ठरतेय अमळनेरला चर्चेचा विषय

उमेश काटे

अमळनेर : येथिल आर के नगर चे रहिवासी शिंदे दांपत्यानी  "आरोग्य संरक्षक गुढी" उभारून कोरोना विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या आरोग्य सेवक, पोलिस प्रशासन व स्व: स्वच्छतेच्या माध्यमातून कोरोना वर विजय मिळविण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक ठिकाणी उत्साहात गुढीपाडवा  साजरा केला जातो.दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने याच दिवशी शकांचा पराभव केला. अशी कथित आख्यायिका प्रचलित आहे.यावेळी प्रत्येकाच्या दारी विजयाचे प्रतिक म्हणून गुढी किंवा पताका उभारली जाते. 

सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे व शिक्षण विस्तार अधिकारी सौ शैलजा शिंदे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आगळी वेगळी गुढी उभारली.कोरोना विषाणूच्या विरोधात विजय मिळविण्यासाठी लढणाऱ्या आरोग्य, पोलिस, शासन प्रशासन यांना यश मिळण्याची प्रतिक असलेली "आरोग्य संरक्षक गुढी" उभारली.


कोरोना विरोधात देशभर लॉक डाऊन मध्ये शिस्त पाळायला लावणाऱ्या पोलिस काठीवर  स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेणाऱ्या आरोग्य परिचारिका यांचा प्रतिकात्मक पांढरा वेश ठेवून त्यावर कोरोना साथीच्या विरोधात शासनाच्या आदेशांचे कोट्यवधी जनतेला पालन  करायला लावण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या पोलिसांचे प्रतिक म्हणून पोलिस टोपी ठेवण्यात आली. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरांचे प्रतिक म्हणून स्टेट्सकोप टांगण्यात आला.तर स्व: स्वच्छतेचे  व स्व: काळजीचे प्रतिक म्हणून मास्क या आरोग्याच्या गुढी वर बांधण्यात आले सदरची गुढी दारी उभारण्यात आली. गुढी ला अंगणातील झाडांच्या फुलांची माळ घरीच करून चढवण्यात आली. रणजित शिंदे व सौ शैलजा शिंदे यांनी कन्या शैलजित सह आरोग्याच्या संरक्षक गुढीचे पूजन केले.सोबतच  कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवण्याचा निर्धार करून  गर्दीपासून दूर राहण्याचा संकल्प गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT