live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

कर्जमाफी योजनेत सरकारचा घोळ : ऍड. संदीप पाटील

सकाळवृत्तसेवा

कळमसरे (ता. अमळनेर) : भाजप सरकार हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे सरकार आहे. सरकारच्या कर्जमाफी योजनेत सर्वांत जास्त घोळ आहे, अशी टीका कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांनी केली. 
मारवड (ता. अमळनेर) येथे आज झालेल्या कॉंग्रेसच्या क्षेत्रीय मेळाव्यात ते बोलत होते. कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष गोकूळ पाटील, युवक जिल्हाध्यक्ष पराग पाटील, नगरसेवक मनोज पाटील, बाजार समितीचे संचालक सुरेश पाटील, जयवंतराव पाटील आदी यावेळी व्यासपीठावर होते. 
ऍड. पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात ज्या प्रमाणे सरसकट कर्जमाफी दिली गेली त्याचे अनुकरण या सरकारने केले असते तर त्याचा शेतकऱ्यांना लाभ झाला असता. पेट्रोल, डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मात्र, त्यावर सरकारचे नियंत्रण नाही. देखरेख संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव पाटील, भोरटेकचे माजी सरपंच दिलीप पाटील, धारचे माजी उपसरपंच अलिम मुजावर, संभाजी पाटील (लोण), विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील, अध्यक्ष उमाकांत पाटील, संचालक बी. डी. पाटील, राकेश मुंदडा, अनिल पाटील, श्रीराम पाटील (वाघोदा), हेमंत पाटील (पाडळसरे), विश्‍वास पाटील (करणखेडा), दिलीप पाटील (तांदळी), महारू शिसोदे (डांगरी) आदी यावेळी उपस्थित होते. शांताराम पाटील यांनी नियोजन केले. मारवड विकास संस्थेतर्फे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांचा सत्कार केला. तिळवण तेली समाज कार्यकारिणी नूतन निवडीबद्दल मारवड तेली समाज अध्यक्ष एल. जी. चौधरी, उपाध्यक्ष अशोक चौधरी, सचिव प्रदीप चौधरी यांचा, तर खाशीचे संचालक योगेश मुंदडा, के. व्ही. पाटील यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला. प्रदीप चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. के. व्ही. पाटील यांनी आभार मानले. सुनील पाटील व सुदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. 

भाजपला जनता धडा शिकवेल 
भाजप सरकारबद्दल जनतेत प्रचंड रोष आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठल्याही ठोस योजना राबविलेल्या नाहीत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईला जनता कंटाळली आहे. आगामी निवडणुकांत जनता त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. आगामी काळात भाजप सरकारला जनताच उलथवून टाकेल, असा सूर उपस्थित कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उमटला. यावेळी शेतकऱ्यांनी शासनविरोधी घोषणाही दिल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT