residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

"अमूल'च्या डिस्ट्रिब्युशनशिपचे आमिष दाखवून लाखोंना गंडा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नामांकित कंपन्यांच्या उत्पादनाच्या डिस्ट्रिब्युशनचे आमिष दाखवून ऑनलाइन लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी ऑनलाईन चोरट्याने "अमूल'च्या डिस्ट्रिब्युशनशिपचे आमिष दाखवून सिडकोतील युवकाला तब्बल 3 लाख रुपयांना गंडविले. याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेश विष्णू आरोटे (रा. राजलक्ष्मी रो हाऊस, महेश भवन, गणेश चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या महिन्यात 6 ते 10 ऑक्‍टोबर या दरम्यान अज्ञात संशयिताने मेलवरून गणेश आरोटे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी संशयिताने अमूल द टेस्ट ऑफ इंडिया या नामांकित कंपनीच्या उत्पादनसाठीच्या डिस्ट्रिब्युशनशिपसंदर्भात विचारणा केली होती. अमूल ही नामांकित कंपनी असल्याने गणेश आरोटे यांनीही त्यासंदर्भात कोणतीही शहानिशा न करता संशयिताच्या आमिषाला बळी पडला. कंपनीची डिस्ट्रिब्युशनशिपसाठी संशयिताने विविध कारणांसाठी गणेश आरोटे यांना बॅंक खात्यावरून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानुसार वेळोवेळी श्री आरोटे याने 3 लाख 10 हजार 500 रुपये संशयिताने सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले. परंतु पैसे भरूनही अमूलची डिस्ट्रिब्युशनशिप मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाल नाही. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. त्यनुसार अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्प परिसरातील व्यावसायिकालाही अशारितीने लाखो रुपयांचा गंडा ऑनलाईन चोरट्याने घातल्याचा प्रकार घडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT