live 
उत्तर महाराष्ट्र

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या अस्थिचे गोदावरीत विसर्जन 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः भारतरत्न, माजी पंतप्रधान स्वर्गिय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज गोदावरीत विधिवत विसर्जन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याहस्ते कलशाचे पूजन केले. महापौर रंजना भानसी यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 
सकाळी दहाच्या पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयातून पक्षाच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अस्थिकलश यात्रा गोदावरीकडे मार्गस्थ झाला. फुलांनी सजविलेल्या यात्रेत अटलजींची प्रतिमा ठेवण्यात आली होती. तसेच अमर रहेचा फलक लक्ष वेधत होता. कलशयात्रा पुढे शालिमार, मेनरोड, रविवार कारंजा, अहिल्यादेवी होळकर पूल, मालेगाव स्टॅन्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकातून रामकुंडावर आली. या ठिकाणी पावसाची शक्‍यता लक्षात घेऊन खास वॉटरप्रुफ मंडपाची उभारणी केली होती. यात्रेत पालकमंत्री गिरीष महाजन,दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, विद्यावाचस्पती विवेक घळसासी, स्वामी सोमश्‍वरानंद, महंत भक्‍तीचरणदास, भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, महापौर रंजना भानसी यांच्याहस्ते अस्थींचे विधिवत विसर्जन झाले. सतिश शुक्‍ल यांच्या नेतृत्वाखाली मंदार देव, शेखर शुक्‍ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्‍ल, बापू देव यांनी वैदिक पद्धतीने विधी झाला. 

सर्वपक्षीयांचा सहभाग 
या कलशयात्रा व विसर्जनावेळी महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, कॉंग्रेसच्या नगरसेविका वत्सला खैरे, कल्पना पांडे, शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादीचे पद्‌माकर पाटील, मनसेचे अशोक मुर्तडक, प्रभाग सभापती ऍड. वैशाली भोसले, योगेश कलाणी, तानाजी गायधनी यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : अंबाला येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ६ वर

SCROLL FOR NEXT