suicide 
उत्तर महाराष्ट्र

पत्नीशी अनैतिक संबंध म्हणून धमकावले...त्याने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयावरुन धमकविल्याने एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास यशवंतनगर भागात घडली. गळफास घेण्यापूर्वी ध्वनी क्लीप सोशल मिडीयावर टाकल्याने उल्लेख केलेल्या सहा संशयीतांपैकी चार संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मृताचे नाव सागर ऊर्फ दादू सुरेश पाटील (वय २१) हा तरुण यशवंतनगर भागात खालची बर्डी येथे आपल्या आत्याकडे राहत होता. याच भागात धनराज बाजीराव पाटील आपल्या कुटुंबीयासह राहतात. धनराज पाटील यांच्या पत्नीशी मृत सागरचे अनैतिक संबध असल्याचा संशय धनराज पाटील यांना होता या कारणावरुन चंदू ऊर्फ दीपक बिरारी, धनराज पाटील, विनोद पाटील, समाधान पाटील, अमोल पाटील, मेघा पाटील (सर्व रा. यशवंतनगर, भडगाव) हे सागर पाटील व त्याच्या घरच्या मंडळी व नातेवाईक यांना धमकवित असत. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून सागरने गळफास घेतला. 

सागरने गळफास घेण्यापूर्वी गळफास का घेत आहे. याचे कारण काय, याचा सर्व उल्लेख संशयीत आरोपीतासह ध्वनी क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल केली होती. मृताचे आतेभाऊ गोरख पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनंत पटारे तपास करीत आहेत. 

 
असे आहेत अटकेतील संशयित 
सागर पाटीलच्या अत्महत्तेस कारणीभुत सहा जणांपैकी धनराज पाटील, विनोद पाटील, समाधान पाटील, अमोल पाटील या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT