live 
उत्तर महाराष्ट्र

आईवडील होते भगताच्या भरवशावर,,,पण श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांने बालकाला नेले रूग्णालयात आणि....

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे, काळुस्तेः भगताकडे उपचारासाठी नेलेल्या बालकाला श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित पालकांना समजून सांगत रुग्णालयात दाखल करून जीवदान दिले. बालकाची तब्येत सुधारत आहे. 

त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील टाकेदेवगाव येथील धाराचीवाडी येथील दीड वर्षाच्या कुपोषित बालकाला रुणालयात दाखल करून काचेच्या पेटीत ठेवल्यानंतर त्याचे वजन वाढले. पण नंतर ते पुन्हा आजारी पडले. त्यामुळे त्याचे वजन घटले. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करणे गरजेचे होते. अंगणवाडी कार्यकर्तीने या मुलाच्या आई-वडिलांना याबाबत समजावून सांगितले.

रुग्णालयात जाण्यास आई-वडिलांनी नकार दिला. आमच्या बाळाला कोणीतरी भूतबाधा केली असून, आम्ही त्याला भागताकडे नेतो, असे सांगून रुग्णालयात नेत नव्हते. त्यामुळे बाळाची तब्येत खालावत होती. तरीही आई-वडील त्याला रुग्णालयात नेत नव्हते, याची माहिती श्रमजीवी संघटनेचे त्र्यंबकेश्‍वर तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांना मिळाली. त्यांनी त्या बाळाचे घर गाठले. मात्र त्या बाळाला त्याची आजी सकाळीच तळेगाव (ता. इगतपुरी) येथील भगताकडे घेऊन गेली होती. 

अंधश्रध्देचे जीवंत उदाहरण
डोखे यांनी बाळाच्या आई-वडिलांची समजूत काढून बाळाला त्र्यंबकेश्‍वर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर त्या बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी श्रमजीवी संघटनेच्या तानाजी शिंदे यांनी घेतली आणि आता ते स्वतः बाळाला व बाळाच्या आईला घेऊन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. किती अंधश्रद्धा घट्ट आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्या बाळाच्या आजीने बाळाला दवाखान्यात नाही, तर भक्ताकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. श्रमजीवी संघटनेने जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर अडवून बाळाला दाखल करून घेतले व आजीचा प्रयत्न हाणून पाडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉस्टेलमध्ये झोपलेल्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात मित्रांनी घातलं फेविक्विक, ८ जणांना रुग्णालयात केलं दाखल

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

SCROLL FOR NEXT