reti tractor
reti tractor 
उत्तर महाराष्ट्र

वाळूने भरलेले ट्रॅक्टर पेटविले 

सकाळ वृत्तसेवा

भडगाव : पिंपळगाव (ता. भडगाव) येथील ग्रामस्थांनी काल (८ मार्च) रात्री बाराच्या सुमारास गिरणा नदीपात्रात वाळू भरणारे ट्रॅक्टरच पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
पिंपळगाव (ता. भडगाव) येथील गिरणा नदी पात्रात रात्री बाराच्या सुमारास एका ट्रॅक्टरमध्ये अनधिकृतरीत्या वाळू उपसा करून भरली जात असल्याची माहिती ग्रामस्थांना समजली. त्यामुळे ग्रामस्थांनी नदीपात्रात धाव घेऊन ट्रॅक्टरकडे वाळू भरली जात असल्याचे पाहिले. संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टरच पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील ग्रामस्थांनी पहिल्यांदाच अवैधरीत्या वाळू वाहतुकीच्या विरोधात एवढे टोकाचे पाऊल उचलले आहे. 

ग्रामस्थांचा उद्रेक 
पिंपळगाव येथील गिरणा नदीपात्रातून वाळू माफियांकडून अनधिकृतरीत्या मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाकडे यापूर्वीच केली होती. मात्र, तरीही वाळूची वाहतूक बंद होत नसल्याने ग्रामस्थांनी वाळू भरण्यासाठी आलेले ट्रॅक्टरच पेटवून दिल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी रात्री महसूल प्रशासनाकडून कोणीही पोहचले नव्हते. शिवाय पोलिस ठाण्यातही याबाबत कुठलीही नोंद झालेली नाही. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे. 

ट्रॅक्टर नदीपात्रात काय करत होते? 
दरम्यान, हे ट्रॅक्टर कोणाचे होते ते अद्याप समजू शकले नाही. ट्रॅक्टर जाळण्यात आले आहे, पण हे ट्रॅक्टर वाळूच भरण्यासाठीच आले होते की अन्य ठिकाणी जात होते. ग्रामस्थांनी संशयावरून ट्रॅक्टर तर जाळले नाही ना? असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेत तक्रारदार म्हणून कोणीही अद्याप पुढे आलेले नाही. याबाबत अधिकृत तक्रार दाखल झाल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. ग्रामस्थ सध्या वाळू चोरीवर ‘ॲक्शनमोड’मध्ये आहेत, हे मात्र निश्‍चित. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT