corona 
उत्तर महाराष्ट्र

भुसावळात पुन्हा 8 कोरोना बाधित; शहर चार दिवसांसाठी पूर्णतः लॉकडाउन

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आज पुन्हा 8 रुग्ण आढळून आल्याने, शहरातील कोरोना बधितांची संख्या 39 वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना चा मुकाबला करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली, यावेळी शहर 17 तारखेपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव ही चिंताजनक बाब आहे. दररोज शहराच्या नवीन भागात भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत एकूण 31 रुग्ण आढळून आले असून, आज तर एकाच दिवशी 8 रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 39 झाली आहे. यातील सात रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला असून 25 जण उपचार घेत आहेत. 

 नागरिक बेपर्वा 
कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासन उपाययोजना करीत आहे. तर पोलिसांतर्फे ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असले तरी तरी असले तरी नागरिक मात्र बेपर्वा असल्याचे चित्र आहे. शहरात भाजीपाला तसेच किराणा दुकानावर होणारी वाढती गर्दी, रस्त्यांवर फिरणारे नागरिक ही बाब कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक आहे. 

बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई 
प्रांताधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी प्रतिबंधित क्षेत्रातील नगरसेवकांनी अत्यावश्‍यक सेवा पुरवण्याची मागणी केली. तर काही नगरसेवकांनी शहर पूर्णपणे बंद ठेवण्याची सूचना केली. यानंतर सर्वानुमते 17 तारखेपर्यंत शहर पूर्णपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्स आणि दूधविक्री वगळता किराणा, भाजीपाला सह इतर सर्व पूर्णपणे बंद राहणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज रात्रीपासूनच केली जाणार आहे. 

यांची होती उपस्थिती 
या बैठकीत आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी कल्पना डहाळे, नगरसेवक प्रा. सुनील नेवे, उल्हास पगारे, नितीन धांडे, पिंटू कोठारी, दुर्गेश ठाकूर, रमेश मकासरे आदि नगरसेवक तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 

तीन पुरुष व 5 महिलांचा समावेश 
शहरात आज पुन्हा 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात तलाठी कॉलनी, भज्जेगल्ली, जाम मोहल्ला, लाल बिल्डिंग, आयेशा कॉलनी, खडकारोड याठिकाणच्या 3 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळेतली पोरं...! डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानात शाहीन आफ्रिदीची उडवली खिल्ली; PSL च्या पत्रकार परिषदेत केला ना कल्ला... Video Viral

Hindu Muslim Unity : दुकानाला भीषण आग अन् आत शंकराची मूर्ती, धर्माच्या सीमा ओलांडून मुस्लिम तरुणांनी केलं धाडस, राज्यभरातून होतेय कौतुक

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत दुचाकी फक्त दोनशे, तर चार चाकी वाहनामध्ये दोन हजार रुपयांचे इंधन भरता येणार

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

Kolhapur Fuel Limit : दुचाकीत 200 तर, चारचाकीत 2000 पर्यंतच मिळणार पेट्रोल; साठे बाजार करणाऱ्यांवर होणार कारवाई, बाटली-कॅनमधून दिल्यास दंड!

SCROLL FOR NEXT