उत्तर महाराष्ट्र

कोरोनाच्या संकट...मजुरांच्या सुरक्षित प्रवासासाठी आरपीएफ दलाचे मदत कार्य 

सकाळवृत्तसेवा

भुसावळ  : कोरोना विरुद्ध देशभर सुरू असलेल्या लढाईत रेल्वे सुरक्षा दल, सामाजिक जाणीव आणि प्रतिबंध या प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत खांद्याला खांदा लावून उभे असलेले आरपीएफचे कर्मचारी, श्रमिक प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी, अपघात टाळण्यासह हजारो प्रवाशांना मदत आणि अन्न पुरवत आहेत. कोरोना विरुद्धच्या युद्धात ते योद्धा म्हणून उभे राहिले आहेत. 

मध्य रेल्वेने आतापर्यंत ५ लाखाहून अधिक श्रमिक कामगार आणि अडकलेल्यांना ३८० हून अधिक श्रमिक विशेष गाड्यांमधून पाठविले आहे. या गाड्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी, मास्क घालण्यावर देखरेख ठेवणे, रेल्वेत आत जाताना, रेल्वेतील प्रवासात आणि सामाजिक अंतरांचे काटेकोरपणे पालन करणे यासाठी १,५०० हून अधिक आरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी देशाची गरज समजून कर्तव्य बजावण्यास तत्पर असून, प्रवाशांना मार्गदर्शन करणे, महिला व मुलांना मदत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यांना सुरक्षित प्रवासासाठी प्रेरित करीत आहेत. 

औषधोपचारासह भोजनाची मदत 
आरपीएफ कर्मचाऱ्‍यांनी औषधोपचाराची गरज असणाऱ्या प्रवाशांना पुढील स्थानकात रेल्वेचे डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय नियंत्रण कक्षांना माहिती देऊन मदत केली आहे. मध्य रेल्वेवरील स्थानकांवर बंदोबस्तासाठी दररोज सुमारे १,००० आरपीएफ कर्मचारी तैनात केले जात आहेत. गरजू प्रवाशांना जेवण उपलब्ध करून दिले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT