Pointless 
उत्तर महाराष्ट्र

कोरोनासाठी यांचा बचाव...निराधारांना घातली अंघोळ 

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : कोरोना महामारीवर उपाय म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर सांभाळणे, तोंडावर मास्क लावणे आदी महत्वाचे आहे. मात्र, शहरात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या निराधार व्यक्तींना हे शक्‍य नसल्याने ओम सिध्दगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे अशा निराधार व्यक्तींची आंघोळ घालून कपडे, खाद्यपदार्थांसह वैयक्तिक स्वच्छताविषयक साहित्य देण्यात आले. 

भुसावळ नगरपरिषद संचालित श्री संत गाडगेबाबा महाराज नगरपालिका दवाखान्यात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहरातील अति गरजू, गलिच्छ राहणारे, इतरत्र फिरणारे माणसे जमा करून त्यांना दवाखान्यात आणण्यात आले. तिथे त्यांना साबण, शॅम्पूने आंघोळ घालण्यात आली. नंतर सर्वांचे केस आणि दाढी करण्यात आल्यावर सर्वांना नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यावतीने कपडे तर प्रतिष्ठानतर्फे आंघोळीचा आणि कपडे धुण्याचे साबण, तेल, पावडर, दंत मंजन, मास्क, सॅनिटीझर, स्लीपर आदी असे स्वच्छता किट देण्यात आले. नगरपरिषद दवाखान्यात सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली नंतर परत त्यांना जेवणाचे डबे देण्यात आले. यावेळी रवींद्र निमानी, डॉ. कीर्ती फलटणकर यांची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितु पाटील, मंगेश निकम, किरण पाटील, प्रसन्न पाटील, निलेश मालविया, हर्शल बोरनारे, पारस सरोदे, संदीप चौधरी, राज गुजराती, नासीर याकूब, संजय ठाकूर यांनी सहकार्य केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT