doctor 
उत्तर महाराष्ट्र

भुसावळात अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची अशीही तत्परता

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : एकीकडे शहरातील खाजगी दवाखाने बंद असल्याच्या चर्चेने जनतेत संभ्रमाचे वातावरण असतांनाच दुसरीकडे भुलतज्ज्ञासह सर्व डॉक्टर एकत्र येऊन अत्यावश्यक शस्त्रक्रिया करीत रुग्णासेवेत तत्परता दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत अॅपेन्डिस व पोटाच्या विकारा संदर्भातील तातडीच्या शस्त्रक्रिया शहरातील विविध रुग्णालयात यशस्वी करण्यात आल्या.
कोरोनाच्या दहशतीमुळे खाजगी दवाखाने बंद असलेल्या बाबतच्या तक्रारी येत होत्या. त्यात काही प्रमाणात तथ्य होते. अनेक रुग्णांचे हाल होत होते. मात्र या पार्श्वभूमीवर सुद्धा आता रुग्णांना चांगला अनुभव येत असल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत. जळगाव जामोद येथील एक 27 वर्षाची तरुणी अपेंडिक्सच्या विकाराने त्रस्त होती. भुसावळच्या विश्वनाथ हॉस्पिटल तीला आणण्यात आले. डॉ. विनायक महाजन यांनी तिच्यावर अत्यावश्यक म्हणून शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. संज्योत पाटील व डॉ. दीपक जावळे ह्यांनी तातडीने मदत केली. डॉ. वीरेंद्र झांबरे यांच्या प्रतिभा हॉस्पिटल मध्ये पोटातील गोळ्या मुळे असह्य वेदना होत असलेल्या 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांना तिथे भूल तज्ञा डॉ. देवयानी नेहेते व डॉ. हर्षा फिरके यांनी तातडीने येऊन मदत केली. याच दिवशी डॉ. प्रदीप फेगडे यांच्या मुक्ताई हॉस्पिटल मध्ये एका नवजात अर्भकावर एनआयसीयु मधे तातडीचे उपचार करण्यात आले. श्री रिदम हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात रोज किमान 3 ते 4 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत आहेत. इतर सर्जिकल हॉस्पिटल्स मध्ये देखील अत्यावश्यक शस्त्रक्रिया होत आहेत. नगरसेवक पिंटु कोठारी हे काही दिवसांपूर्वी एका रक्तबंबाळ मुलाला डॉ. किरण झांबरे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांना देखील याचा अनुभव आला.

काही वेळा दवाखाने बंद राहतात यात प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ (हॉस्पिटल स्टाफला येण्यास अडचणी) आणि अपुरी साधन सामुग्री अशी कारणे आहेत. शहरात अनेक प्रतिबंधित क्षेत्रे आहेत यामुळे महत्वाचे मुख्य रस्ते बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा कर्मचारी कामावर येऊ शकत नाहीत. ओपन क्षेत्रात जवळ - जवळ सगळ्या दवाखान्यात प्रशासनाने सूचना दिल्या पासून अत्यावश्यक रुग्ण सेवा चालू आहेत. 
डॉ. नितीन दावलभक्त, भुसावळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT