sari virus 
उत्तर महाराष्ट्र

भुसावळात सारी आजाराने एकाचा मृत्यू; मृतदेहाची अवहेलना

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जळगाव) : शहरातील खडका रोड भागातील ३२ खोली रस्‍ता वळणावरील आशादिप बिल्‍डींगसमोर एका ४८ वर्षीय व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी काल (ता. २३) रात्रीच हा मृतदेह आणून रस्त्यावर ठेऊन पळ काढला. अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना पालिका आणि आरोग्य प्रशासनाकडून मदत न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

शहरातील ३२ खोली भागातील ४८ वर्षीय व्यक्तीस गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. काल (ता. २३) उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रात्रीच मृतदेह रूग्‍णवाहीकेतून आणून घराबाहेर सोडून निघून गेले. मृताचे दोन भाऊ आहेत. मात्र ते मनोरुग्ण असल्याने हा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. परिसरात निर्जंतुक फवारणी आणि उपाययोजना होणे आवश्यक असतांना नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. संसर्गजन्‍य आजाराने मृत्‍यू झाल्‍याने अंत्‍यसंस्‍कार कसे करावे? असा प्रश्‍न उपस्‍थित झाला होता. सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील, साजीद शेख यांनी अंत्‍यसंस्‍कारासाठी नगराध्‍यक्ष रमण भोळे व मुख्‍याधिकारी करूणा डहाळे यांच्‍याशी संपर्क साधला असता, त्‍यांचे भ्रमणध्‍वनी बंद होते. नगरपरिषद रूग्‍णालयाच्‍या महिला वैद्‍यकिय अधिकारी डॉ. किर्ती फलटणकर यांच्‍याशी संपर्क साधून कर्मचारी व शववाहिनीची मागणी केली. मात्र त्‍यांनी त्‍यास नकार दिला. पीपीई किटची मागणी त्‍यांनी मान्‍य करून दोन किट उपलब्‍ध करून दिले. परिसरातील काही हिंदू-मुस्लिम बांधवांनी शेवटी मृतदेह नेत अंत्‍यसंस्‍कार केले. 

मृत व्यक्तीसोबत रुग्णालयाने सारी आजाराने मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे मृतदेहाची हाताळणी करणे धोकादायक होते. यासाठी पालिका आणि आरोग्य प्रशासनाची मदत आवश्यक होती. मात्र, ती मिळू शकली नाही. शेवटी परिसरातील रहिवाशांनीच पीपीइ कीट घालून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. 
- सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते, भुसावळ. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT