goods train 
उत्तर महाराष्ट्र

लॉकडाऊन मध्ये भुसावळ रेल्वेने केली २ लाख  टन्सची माल वाहतूक 

सकाळवृत्तसेवा

भुसावळ : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद आहे. मात्र रेल्वेने माल वाहतूक सुरु ठेवल्याने देशभरात अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा होत आहे. एप्रिल महिन्यात भुसावल मंडळने २ लाख ४२ हजार टन्सची माल वाहतूक लोड केली आहे. त्यात पार्सलसह आवश्यक वस्तूची ४४४ टन पार्सल वाहतुक करण्यात आली आहे. 

महिनाभरात ४ हजार ६१७ वॅगनमध्ये लोडींग ही भुसावल मंडळमधे विविध स्थानकावर करण्यात आली आहे. आवश्यक वस्तू आणि मालाची वेळेवर वाहतूक सुनिश्चित करून कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी भारतीय रेल्वे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याप्रसंगी रेल्वे कर्मचारी उभे ठाकले आहेत आणि उत्कटतेने तसेच समर्पणाने उत्कृष्ट कार्य करीत आहेत. 

भुसावल मंडळ रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या नेतुत्वात वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनात पार्सल व माल वाहतूक करण्यासाठी विशेष सोई सुविधा पुरवीत एक मोठी कामगिरी केली आहे. ऑनलाइन बैठकीद्वारे व्यापारी, उद्दोगपती, चेंबर्स ऑफ कॉमर्स, एमआयडीसी आदी असोशिएशनच्या सदस्यांसोबत संवाद साधून त्याना मध्य रेल्वेद्वारा करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जात आहे. 

लॉकडाउन कालावधीत, मध्य रेल्वे देशभरात अत्यावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा सुनिश्चित करून कोरोनाव्हायरसशी झूंज देत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रवासी सेवा थांबविल्या असल्या, तरी अन्नधान्य, औषध, कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि इतर आवश्यक वस्तू जसे की भाजीपाला आणि अन्य आवश्यक आपत्कालीन सेवांचा पुरवठा मालगाड्या विशेष पार्सल गाड्यांमधून भारतीय रेल्वेवरून सुरू आहे. मध्य रेल्वेच्या, भुसावळ विभागातून दररोज लोडिंग अनलोडिंगसाठी विविध टर्मिनल्सवर रॅक (मालगाड्या) हाताळले जात आहेत. विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील मध्य रेल्वेचे कर्मचारी मालगाडी सुरक्षित आणि सुरळीत चालविण्यासाठी २४ तास कार्यरत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT