उत्तर महाराष्ट्र

Vidhan sabha : भाजप बंडखोरांच्या मतपत्रिकेवरील सहा अनुक्रमांकावर आश्‍चर्य! 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विधानसभेच्या जिल्ह्यातील 11 मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. यात चार मतदारसंघांत भाजपतर्फे बंडखोरी झाली आहे; तर एका मतदारसंघात शिवसेनेतर्फे बंडखोरी झाली आहे. मात्र, शिवसेनेविरुद्ध भाजपने बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक सहा असल्याने मतदारांमध्ये आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून, या योगोयोगाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात तर्कवितर्कही लढविले जात आहेत. 

जिल्ह्यात पाचोरा मतदारसंघ महायुतीच्या वाट्यात शिवसेनेकडे आहे. या ठिकाणी शिवसेनेचे किशोर पाटील उमेदवार असून, त्यांच्याविरोधात भाजपचे अमोल शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचा मतदारयादीतील अनुक्रमांक सहा आहे; तर जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सहकार राज्यंमत्री गुलाबराव पाटील आहेत. त्यांच्या मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत अत्तरदे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचाही मतपत्रिकेतील अनुक्रमांक सहा आहे. चोपडा मतदारसंघात शिवसेनेतर्फे लता चंद्रकांत सोनवणे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचाही अनुक्रमांकही सहा आहे; तर रावेर मतदारसंघात भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांच्याविरोधात भाजपचे अनिल चौधरी यांनी बंडखोरी केली आहे. त्यांचाही अनुक्रमांक सहाच आहे. मात्र, या उमेदवारांची चिन्हे वेगवेगळी आहेत. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. त्यांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक पाच आहे. भाजपच्या बंडखोर उमेदवारांचा मतपत्रिकेवर अनुक्रमांक सहा येणे हा योगायोग कसा? अशी चर्चा आता या मतदारसंघात सुरू असून, त्यावर अनेक तर्कवितर्कही लावले जात आहेत. 
 
निवडणुकीत अनुक्रमांक देताना राजकीय पक्षाच्या उमेदवाराला "अल्फाबेट'नुसार अगोदर स्थान दिले जाते. त्यातही राजकीय पक्ष देशपातळीवरील आहे किंवा राज्य पातळीवर आहे, हे पाहिले जाते. नंतर अपक्षांना अनुक्रमांक दिला जातो. चिन्हाबाबत अगोदरच अपक्ष आपल्याला कोणते चिन्ह पाहिजे, ते नमूद करतात. त्यानुसार त्यांना चिन्ह दिले जाते. 

- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT