उत्तर महाराष्ट्र

झोपडीत पेटवली शेकोटी...आणि वृध्दाचा होरपळून मृत्यू ! 

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव : रांजणगाव (ता. चाळीसगाव) शिवारात शेतातील झोपडीला शेकोटी पेटवल्याने झोपडीत एकट्या राहत असलेल्या वाघडू (ता. चाळीसगाव) येथील वृद्धाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

वाघडू येथील रहिवासी कारभारी पाटील यांची गावाजवळच्या रांजणगाव शिवारात शेती आहे. त्यांचे वडील देवराम नंदाराम पाटील (वय ७०) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे सुमारे पंधरा वर्षांपासून ते शेतातील झोपडीतच राहत होते. कारभारी पाटील हे आज सकाळी साडेसहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेतात जाऊन वडिलांना चहापाणी देऊन व गायीचे दूध काढून घरी आले. त्यानंतर साडेआठच्या सुमारास त्यांना शेजारी राहणारे संदीप पाटील यांनी मोबाईलवरून सांगितले, की तुमच्या झोपडीला आग लागली आहे. हे कळताच कारभारी पाटील हे नीलेश पाटील यांना सोबत घेऊन दुचाकीने शेतात गेले असता, झोपडी पूर्णपणे जळून गेली होती. झोपडीतील शेतीपयोगी अवजारेही जळून खाक झाले होते. देवराम पाटील यांना दररोज सकाळी तगारीत शेकोटी करून अंग शेकण्याची सवय होती. आज देखील त्यांनी शेकोटी पेटवली व त्यांच्या खाटेवरील अंथरूनाने त्यामुळे पेट घेतला व त्यात झोपडीला आग लागून आगीत देवराम पाटील यांचा होरपळून मृत्यू झाला. हा प्रकार गावात कळताच एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याबाबत कारभारी पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तत्काळ तहसीलदार अमोल मोरे यांच्याशी चर्चा करुन मृत वृद्धाच्या कुटुंबीयांना मदत करण्याबाबत सूचना केली
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT